लडाख आमचाच! भारताने २८ ठिकाणांची नावे जाहीर करताच चीनची आडमुठी भूमिका, नामकरणाला विरोध

China Claims Ladakh : भारताने २ ऑक्टोबर रोजी या ठिकाणांची अधिकृत ओळख निश्चित केली. त्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील (LAC) गोगरा आणि हॉट स्प्रिंग्स यांसारख्या संवेदनशील भागांचाही समावेश आहे.
China Claims Ladakh

China Claims Ladakh

esakal

Updated on: 

लडाखमधील २८ महत्त्वाच्या ठिकाणांना आणि भौगोलिक क्षेत्रांना अधिकृत नावे देण्याच्या भारताच्या निर्णयावर चीनने आक्षेप घेतला आहे. एवढंच नाही, तर संपूर्ण लडाखचा प्रदेश आपलाच असल्याचा दावाही चीनने केला आहे.

चीनच्या या भूमिकेमुळे भारत आणि चीन यांच्यातील सीमावादाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. भारताने २ ऑक्टोबर रोजी या ठिकाणांची अधिकृत ओळख निश्चित केली होती. त्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील (LAC) गोगरा आणि हॉट स्प्रिंग्स यांसारख्या संवेदनशील भागांचाही समावेश आहे.

China Claims Ladakh
EOL Vehicle: जुन्या वाहनधारकांना मोठा धक्का! १० वर्षांची डिझेल, १५ वर्षांची पेट्रोल कार होणार थेट जप्त; राज्य सरकारचा कडक निर्णय
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com