कोकण

आयुष कदमची कला शिबिरासाठी निवड

CD

69634
आयुष कदमची कला शिबिरासाठी निवड
चिपळूण ः सावर्डे येथील सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट येथील पेंटिंग विभागात द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या आयुष कदम याची प्रतिष्ठेच्या कला शिबिरासाठी निवड झाली आहे. कॅमल आर्ट फाउंडेशनतर्फे आयोजित शिबिर ७ ते ११ डिसेंबर या कालावधीत नागपूर येथील शासकीय कला महाविद्यालय येथे होणार आहे. या निवडीमुळे आयुषला विविध कलावंतांशी संवाद साधण्याची, त्यांच्या कलाकृतींचा अभ्यास करण्याची तसेच चित्र निर्मितीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. या शिबिराच्या माध्यमातून त्याला चित्रकलेतील विविध तंत्रे, कलात्मक दृष्टिकोन आणि सर्जनशीलतेच्या नव्या संकल्पना जाणून घेता येणार आहेत.

सारस्वत मंडळातर्फे शनिवारी नवरात्रोत्सव
रत्नागिरी ः सारस्वत स्नेहवर्धक मंडळातर्फे शनिवारी (ता. १७) नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मारुती मंदिर येथील महिला मंडळ सभागृहात सायंकाळी ४ ते रात्री ८ या वेळेत हा उत्सव उत्साहात साजरा होणार आहे. रत्नागिरीतील सारस्वत स्नेहवर्धक मंडळाने अनेक वर्षांपासून नवरात्रोत्सवाची परंपरा जपली आहे. या उत्सवाच्या निमित्ताने श्री सरस्वती देवीचे पूजन, आरती, भजन, गायन, वादन आणि नृत्य अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातून महिलांना एकत्र येण्याची, आपापल्या कलागुणांचे सादरीकरण करण्याची आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन करण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय, जुन्या मैत्रिणींच्या भेटीगाठी, गप्पागोष्टी आणि जुन्या आठवणींना उजाळा देत स्नेहबंध अधिक दृढ करण्याची संधीही उपलब्ध होणार आहे. रांगोळी काढण्याची आवड असलेल्या महिलांसाठी दुपारी ३ वाजल्यापासून सभागृह उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिलांनी आपले नाव, सादरीकरणाचा प्रकार आणि त्यासाठी लागणारा अंदाजित कालावधी याची माहिती आयोजकांना व्हॉट्सॲपद्वारे पाठवावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Rally: शेअर बाजारात तुफान तेजी! गुंतवणूकदारांची चांदी; सेन्सेक्स १,१०९ अंकांनी वधारला

Pregnant journalist allegation: गर्भवती महिला पत्रकाराला राहुल गांधींनी धक्का दिल्याचा आरोप; 'एक्स-रे'वरून काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न

Latest Marathi News Live Update: ज्ञानेश कुमार हे माफिया आहेत- संजय राऊत

WTC Points Table: ऑस्ट्रेलियाच्या विजयाने भारताच्या WTC Final खेळण्याच्या स्वप्नाचा चुराडा? जाणून घ्या समीकरण

Pune News : गंभीर आजारी वडिलांचे पालकत्व मुलीकडे; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय, ‘पेरेन्स पॅट्रिए’ तत्त्वाचा आधार

SCROLL FOR NEXT