rat१४p१५.jpg-
26O69955
रत्नागिरी ः येथील दामले विद्यालयात मार्गदर्शन करताना पालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी प्रा. सुधाकर मुरकुटे. शेजारी मान्यवर.
---
गुणवत्तेसाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा
सुधाकर मुरकुटे ः दामले विद्यालयात गुणवंतांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ : शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत एखाद्या शाळेचे विद्यार्थी स्थान मिळवतात, हे त्या शाळेच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्याचे द्योतक आहे. त्यामुळे नगरपरिषद शाळांमधील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये मूल्यसंवर्धनासोबतच शैक्षणिक गुणवत्ता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन रत्नागिरी नगरपरिषद शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी प्रा. सुधाकर मुरकुटे यांनी केले.
नगरपालिका शिक्षण मंडळाच्या सर्व शिक्षकांसाठी शहरातील दामले विद्यालयात शिष्यवृत्ती मार्गदर्शन व मूल्यवर्धन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रा. मुरकुटे बोलत होते. व्यासपीठावर दामले विद्यालयाचे मुख्याध्यापक व केंद्र समन्वयक भगवान मोटे, संदीप कांबळे, मार्गदर्शक शिक्षक रवींद्र शिंदे, योगेश कदम आणि वर्षा म्हादे उपस्थित होते. भगवान मोटे यांनी प्रास्ताविकात दामले विद्यालयाच्या वाढत्या पटसंख्येचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवलेले यश हा पटसंख्या वाढीमागील महत्त्वाचा घटक असल्याचे त्यांनी नमूद केले. या वेळी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांसह यंदा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा प्रा. मुरकुटे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
नगरपालिका शाळा क्र. १९, आंबेशेत येथील तीन विद्यार्थ्यांनी यंदा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. या यशामागील नियोजन आणि प्रयत्नांची माहिती वर्षा म्हादे यांनी दिली. शिष्यवृत्ती परीक्षेचा पाया पहिलीपासूनच भक्कम करण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध बाह्यस्पर्धा परीक्षांना प्रविष्ट करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. रवींद्र शिंदे यांनी गणित विषयाच्या शिष्यवृत्ती अभ्यासक्रमाविषयी मार्गदर्शन केले. योगेश कदम यांनी बुद्धिमत्ता विषयातील सोपे घटक तसेच कूटप्रश्न सोडवण्याच्या सहज आणि रंजक पद्धती शिक्षकांना समजावून सांगितल्या. प्रशांत मांडवकर यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.