कोकण

तुरुंबव जोडरस्त्याच्या निविदा प्रक्रियेत दिरंगाई

CD

- rat१४p९.jpg -
26O69960
चिपळूण - सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना शिवानी सावंत.
---
निधी मंजूर, तरी रस्त्याचे काम रखडले
तुरंबव जोडरस्ता ; शिवानी सावंत आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १४ : तालुक्यातील तुरंबव येथील श्री शारदादेवी मंदिर रामवाडी ते अबिटगाव या जोडरस्त्याच्या सुधारणेसह डांबरीकरणासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. प्रशासकीय मान्यता मिळूनही अद्याप निविदा प्रक्रिया पूर्ण न झाल्याने जिल्हा परिषद सदस्या शिवानी सावंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली आहे. या दिरंगाईप्रकरणी त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांची भेट घेऊन निवेदन दिले.
सध्या श्री शारदादेवी मंदिरात यात्रा सुरू असून, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे; मात्र, रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने भाविकांसह स्थानिक नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईपर्यंत भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी सावंत यांनी केली. निधी मंजूर असतानाही केवळ प्रशासकीय दिरंगाईमुळे निविदा प्रक्रिया रखडल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. ‘‘निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात करावी तसेच या दिरंगाईची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी,’’ अशी आग्रही मागणी त्यांनी केली. यात्रेच्या काळात भाविक आणि गावकऱ्यांना सुरक्षित व सुकर प्रवास मिळणे आवश्यक असल्याने प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

अन्यथा आंदोलन
तुरंबव येथील श्री शारदादेवी मंदिर रामवाडी ते अबिटगाव या जोडरस्त्यासाठी मंजूर निधी असूनही काम रखडल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही सावंत यांनी यावेळी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

W,W,W,W,W ! दक्षिण आफ्रिकन गोलंदाजाचा कहर, ट्वेंटी-२०त एकाच षटकात सलग पाच विकेट्स VIDEO

Pune News : कामकाजात दुर्लक्ष भोवले; आरोग्‍य विभागाच्‍या दोन सहाय्यक संचालकांचे निलंबन

Maharashtra Live News : मेरठमधील 'ब्लू ड्रम' हत्याकांडात पत्नी मुस्कान आणि तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

Sugarcane Rate Agitation : ऊसदराच्या आंदोलनामुळे कोगनोळी टोलनाक्यावरील वाहतूक ठप्प; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

'या गोजिरवाण्या घरात' मधली दीक्षा आठवते? सध्या काय करते? सांगितलं छोट्या पडद्यावर न दिसण्याचं कारण

SCROLL FOR NEXT