कोकण

ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवण्याची कला आत्मसात करा

CD

rat१४p७.jpg-
P26O69931
रत्नागिरी ः स. रा. देसाई अध्यापक विद्यालयात शारदोत्सवानिमित्त व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्यावर मार्गदर्शनावेळी व्याख्याते राजेश गोसावी यांच्यासह मान्यवर.

ज्ञानासोबत संवादकलेची जोड हवी
राजेश गोसावी ः देसाई विद्यालयात शारदोत्सव कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ : ‘‘भविष्यात शिक्षक म्हणून कार्य करताना तसेच जबाबदार नागरिक म्हणून समाजात वावरताना आपले वर्तन, सकारात्मक दृष्टिकोन आणि क्रियाशील वृत्ती अत्यंत महत्त्वाची ठरते. केवळ ज्ञान असून चालत नाही तर ते प्रभावीपणे इतरांपर्यंत पोहोचवण्याची कला आत्मसात करणे गरजेचे आहे,’’ असे प्रतिपादन पीएमसी झरेवाडी शाळेचे अध्यापक, लेखक, दिग्दर्शक व अभिनेते राजेश गोसावी यांनी केले.
येथील स. रा. देसाई अध्यापक विद्यालयात शारदोत्सव कार्यक्रमांतर्गत ‘व्यक्तीमत्त्व विकास व संवादकौशल्य’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान उत्साहात झाले. स. रा. देसाई अध्यापक विद्यालयात वर्षानुवर्षाच्या परंपरेनुसार शारदोत्सव साजरा करण्यात येतो. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी, या उद्देशाने विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित केली जातात. याच उपक्रमांतर्गत या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. विक्रांत रावराणे यांच्या हस्ते मुख्य व्याख्याते राजेश गोसावी यांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी प्राचार्य डॉ. विक्रांत रावराणे, प्राध्यापक जोपळे, प्राध्यापक सचिन पाटील, प्राध्यापिका आवटे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: 15 ते 31 ऑक्टोबरदरम्यान बँकांना 12 दिवस सुट्ट्या! महाराष्ट्रात कधी बंद राहणार बँका? पाहा संपूर्ण यादी

शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून दुकानदाराला लाठ्या-काठ्यांनी मारहाण, लाथाबुक्क्याही मारल्या; CCTV व्हिडीओ समोर

Latest Marathi News Update : जमीन लिलावाच्या बहाण्याने सव्वा कोटींची फसवणूक

Sujay Vikhe Patil: सुजय विखे पाटील आणि विवेक कोल्हे एकत्र; रामगिरी महाराज म्हणाले, ‘खासदारकीची खुर्ची हवी’

Raju Shetti Warning To Sugar Factories : पहिला गव्हाणीत आमचं रक्त जाईल, त्यानंतर तुमचा ऊस जाईल; साखर कारखाने सुरू करण्यावरून राजू शेट्टींचा सरकारसह कारखानदारांना सज्जड दम

SCROLL FOR NEXT