rat१४p२४.jpg-
७००४०
राजापूर ः पाण्याअभावी खडखडाट झालेले वहाळाचे पात्र.
राजापुरात दुष्काळाच्या झळा - मालिका भाग १
इंट्रो
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमांच्या मध्यवर्ती राजापूर तालुका आहे. अलनिनोच्या प्रभावामुळे यंदा तुलनेमध्ये कमी पाऊस झाला. त्यातून, मुबलक प्रमाणात पाऊस पडणाऱ्या राजापूर तालुक्याचा गेल्या दोन दशकांच्या कालावधीत यावर्षी प्रथमच ‘दुष्काळाच्या ट्रिगर-१’मध्ये समावेश झाला आहे. अनेकवेळा प्रशासकीय कागदोपत्री आणि वास्तवातील स्थिती यामध्ये अनेकवेळा तफावत पाहायला मिळते; मात्र, यंदाची स्थिती त्याला अपवाद असून, प्रशासनाच्या निर्देशाप्रमाणे वास्तव्यात दुष्काळग्रस्त स्थिती आहे. याचा सर्वाधिक परिणाम भातशेतीवर दिसत आहे तसेच भविष्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढणार आहे. भौगोलिकदृष्ट्या अडचणीच्या अशा राजापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचे वास्तव या मालिकेतून मांडण्यात आले आहे...
- राजेंद्र बाईत, राजापूर
ओढे, वहाळ पडले कोरडे
यंदा ३४ टक्के कमी पाऊस; राजापूर तालुक्याचा ट्रिगर-१ मध्ये समावेश
राजापूर, ता. १४ ः तालुक्यात दरवर्षी मुबलक प्रमाणात पाऊस पडतो; मात्र, यावर्षी पावसाचे वेळापत्रकही विस्कळीत झाले आहे. गतवर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत तालुक्यात ३४५८.३३ मिलीमीटर पाऊस पडला होता. यावर्षी त्याच कालावधीत २२६३.५० मि.मी. नोंद झाली. या आकडेवारीचा विचार करता तुलनेमध्ये यंदा ११९४.८३ मि.मी. म्हणजेच ३४.५५ टक्के कमी पाऊस झाला. दरवर्षी मुबलक पडणाऱ्या पावसामुळे राजापूर तालुक्यातील डोंगरदऱ्यातून वाहणाऱ्या ओढ-वहाळांमध्ये नोव्हेंबर महिन्यापर्यंत चांगला पाणीसाठा असतो. डिसेंबरनंतर पाणी कमी होऊ लागते, कालांतराने ती पात्रे कोरडी होऊ लागतात. यावर्षी कमी पडलेल्या पावसामुळे सप्टेंबर महिन्यातच ही परिस्थिती ओढवलेली आहे.
गणेशविसर्जनावेळी अपेक्षित पाणी नसल्याने काही गावांमध्ये कोंडी (खड्डे खोदून) तयार कराव्या लागल्या. अशी परिस्थिती ओघानेच पाहायला मिळाल्याचे अनेकांनी सांगितले. यावरूनच भविष्यातील पाणीटंचाईचे चित्र स्पष्ट झाले आहे. राजापूर तालुक्यात दरवर्षी जून ते सप्टेंबर या काळामध्ये अर्जुना-कोदवली नद्यांना पूर येतो. एक-दोन नव्हे तर सलग पाच ते सहा दिवस पुराचे पाणी स्थिर असते. यावर्षी एकदाही मोठा पूर राजापूरमध्ये आलेला नाही. यावरूनच तालुक्यात किती पाऊस कमी झाला आहे, हे लक्षात येते. पावसाचे असमान वितरण, पडलेले खंड आणि पीकवाढीवर झालेला परिणाम यामुळे राजापूर तालुक्याचा शासनाच्या ट्रिगर-१ अर्थात् दुष्काळ व्यवस्थापनाच्या प्रथम यादीत समावेश झाला. यावर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत पडलेल्या पावसाची आकडेवारी आणि ओढे-नाले-वहाळ याच्यातील घटलेला पाणीसाठा पाहता भविष्यातील पाणीटंचाई अन् दुष्काळ स्थितीचा आलेखच डोळ्यासमोर उभा राहत आहे.
-------
चौकट १
दृष्टिक्षेपात राजापूर
एकूण गावे ः २३६
एकूण ग्रामपंचायती ः १०१
गतवर्षी पडलेला पाऊस ः ३४५८.३३ मि.मी.
यावर्षी पडलेला पाऊस ः २२६३.५० मि.मी.
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी पडलेला पाऊस ः ११९४.८३ मि.मी.
कोट १
सुरवातीपासून पावसाचे प्रमाण कमी-जास्त होणे हे दरवर्षीचे आहे; मात्र, यंदा पावसाळ्यातील कोरड्या दिवसांचे प्रमाण जास्तच राहिले आहे. त्यामुळे आतापासूनच नदी-नाल्यात पाणी नाही. अनेक ठिकाणी नदीपात्र सुकलेली आहेत. हे चित्र पाहता भविष्यात पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार आहे. त्याचा परिणाम माणसांबरोबरच पाळीव जनावरांवरही होणार आहे.
- राजन शिंदे, शेतकरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.