कोकण

देवरुखातील इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेला प्रतिसाद

CD

इंग्रजी वक्तृत्व
स्पर्धेला प्रतिसाद
देवरूख ः देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आणि श्रीमती अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूलच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित आंतरशालेय तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तालुक्यातील सात शाळांमधील एकूण ३७ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. स्पर्धा तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी चार गटांत घेण्यात आली. त्यामध्ये गट क्र. १(तिसरी व चौथी)- अर्जुन पंडित, विहान केळकर, सिया कुचेकर, गट क्र. २ (पाचवी व सहावी) - मनवा मांगले, अनाया साटविलकर, सिद्धी मोहिरे, गट क्र. ३ (सातवी व आठवी)- आयुष चव्हाण, अंतरा सप्रे, वरद दांडेकर, गट क्र. ४ (नववी व दहावी)- वृंदा भाटकर, अर्णव संकपाळ, अद्विका गायकर यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवले.


प्राथमिक आरोग्यसेवेचे
भांबेडमध्ये प्रशिक्षण
लांजा ः तालुक्यातील पहिले तर रत्नागिरी जिल्ह्यातील २३वे सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्यसेवा प्रशिक्षण भांबेड येथे झाले. प्रतापराव माने विद्यालय आणि सुमित्रा देसाई कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित प्रशिक्षणाचे उद्‍घाटन पंचायत समिती सदस्य शैलेश खामकर यांच्या हस्ते झाले. या वेळी पंचायत समिती सदस्य उमेश पत्की, जनआरोग्य समिती सदस्या भांबेड ग्रीष्मा गुरव, सदस्य राजेंद्र गांधी, मुख्याध्यापक मुल्लाणी उपस्थित होते. जिल्हा प्रशिक्षण केंद्र येथील लिंगायत आणि त्यांच्या पथकाने प्रशिक्षणात अनावश्यक रुग्णसंदर्भ कमी करून प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या स्तरावरच अधिकाधिक आरोग्य समस्यांचे प्रभावी व्यवस्थापन व उपचार करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.


सोमवारी महिला
लोकशाही दिन
रत्नागिरी ः महिलांच्या वैयक्तिक तक्रारी व समस्यांचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी ‘जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन’ आयोजित करण्यात येतो. या महिन्याचा महिला लोकशाही दिन सोमवारी (ता. १९) सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. अर्जदार महिलांनी स्वतः उपस्थित राहून आपले निवेदन सादर करणे आवश्यक आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या महिलांचे वैयक्तिक प्रश्न किंवा तक्रारी प्रलंबित आहेत त्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन लोकशाही दिनाला उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Strict Action : मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग अन् भेसळीला पूर्ण बंदी! आयुक्त तुकाराम मुंढेंकडून कडक नियमावली जारी; नियम मोडल्यास थेट कारवाई

Neha Bora: 'सीजेपी'च्या पत्रकार परिषदेत गोंधळ अन् घोषणाबाजी; आंदोलनाची पुढची दिशा केली स्पष्ट

Latest Marathi News Update: लैंगिक शोषणप्रकरणी कोऱ्हाळे खुर्द येथील तरुणावर गुन्हा

Medical Courses : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी शुक्रवारपर्यंत मुदतवाढ

नाना पाटेकरांनी सिंहगडाच्या पायथ्याशीच फार्महाऊस का बांधलं? पुरुषोत्तम बेर्डेंनी सांगितलं कारण, म्हणालेले- इथून महाराजांचे...

SCROLL FOR NEXT