-rat१५p५.jpg-
26O70229
राजापूर ः पाणी कमी अन् पाण्याअभावी कोरडा परिसर जास्त, अशी धरणांची परिस्थिती दरवर्षी जानेवारीपासून दिसून येते.
-----
राजापूरच्या दुष्काळाचा झळा- भाग-२----लोगो
---
भूजल पातळी प्रयत्नाअभावी घटली
टंचाईचे संकट; जलसंधारणाकडेही डोळेझाक, जानेवारीपासून टँकरला होणार मागणी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १५ ः राजापूर तालुक्यामध्ये मुबलक प्रमाणात पाऊस पडूनही पावसाचे पडणारे पाणी जमिनीमध्ये जिरवून भूजल पातळी वाढवण्यासाठी फारसे प्रयत्न झालेले नाहीत. टंचाईग्रस्तासाठी तालुक्यामध्ये सातत्याने टँकर धावला आहे. गेल्या पाच वर्षातील २०२३-२४ हे एकमेव वर्ष अपवाद ठरले आहे. या काळामध्ये टँकर धावला नाही तरी गावांत पाणीटंचाई होती; मात्र, यावर्षी राजापूरमध्ये भीषण टंचाई अन् दुष्काळाचे संकट घोंगावू लागले आहे.
गेल्या पाच वर्षातील टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचा विचार करता दरवर्षी सरासरी १० ते १५ टंचाईग्रस्त गावांकडून टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी केली गेली आहे. दरवर्षी मुबलक प्रमाणात पाऊस पडूनही तालुक्यामध्ये पाणीटंचाई जाणवते. यावर्षी गतवर्षीच्या तुलनेमध्ये तब्बल ३४.५५ टक्के पाऊस कमी पडला आहे. त्यामध्ये घटलेली भूजलपातळीची भर पडली आहे. त्यामुळे यावर्षी पाणीटंचाईची तीव्रता अधिकच जाणवण्याची शक्यता आहे. जानेवारी महिन्यापासून टँकरची मागणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
---
पाच वर्षातील टँकर पुरवठ्याची स्थिती
वर्ष*मागणी*पुरवठा
२०२१-२२* पाच गावे, सहा वाड्या* टँकर नाही
२०२२-२३* ११ गावे, १५ वाड्या* टँकर नाही
२०२३-२४* १६ गावे, १९ वाड्या* १० वाड्यांमध्ये टँकर
२०२४-२५* तीन गावे, तीन वाड्या* टँकर नाही
२०२५-२६* पाच गावे, पाच वाड्या* टँकर नाही
---
भूजल पातळीत चिंताजनक घट
राजापूर तालुक्यातील गेल्या पाच वर्षातील सप्टेंबर महिन्यातील सरासरी भूजल पातळी २.६१ मीटर होती. सप्टेंबर, २०२६ मधील भूजल पातळी ४.०९ मीटर असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर्षीच्या भूजल पातळीमध्ये १.४७ मीटरने घट झाल्याची नोंद झाली आहे. भूजल पातळी अधिकच खालावण्याची शक्यता आहे. तसे घडल्यास पाण्याच्या उपलब्धता चिंताजनक ठरेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.