कोकण

वाशिष्ठी पुलावर अंधार, कचऱ्याचे साम्राज्य

CD

- rat१५p१४.jpg ः
26O70299
चिपळूण ः वाशिष्ठी पुलावर टाकलेला कचरा दाखवताना शौकत मुकादम.
------
वाशिष्ठी पुलावर अंधार; कचऱ्याचा विळखा

पथदिव्यांचा अभाव; नदीपात्रात कचरा टाकण्याचे वाढते प्रकार

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १५ ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील बहादूरशेख-कळंबस्ते येथील नवीन वाशिष्ठी पुलावर पथदिव्यांची व्यवस्था केलेली नाही. परिणामी, रात्रीच्यावेळी अंधाराचा फायदा घेत पुलावर तसेच नदीत कचरा टाकला जात आहे. यामध्ये मासे आणि चिकनचा खराब मालही टाकला जात असल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण होत आहे. हा प्रकार माजी सभापती शौकत मुकादम यांनी उजेडात आणला आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेख-कळंबस्ते येथे नवीन वाशिष्ठी पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन पाच वर्षांहून अधिक काळ लोटला आहे.
मात्र, या पुलावर अद्याप पथदिवे बसवण्यात आलेले नाहीत. संबंधित ठेकेदार कंपनीच्या अंदाजपत्रकात पथदिव्यांची तरतूद असतानाही प्रत्यक्षात त्यांची उभारणी करण्यात आलेली नसल्याचा आरोप शौकत मुकादम यांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
पुलावर रात्रीच्यावेळी अंधार असल्याने काहीजण याचा गैरफायदा घेत पुलावर आणि नदीत कचरा टाकत आहेत. विशेषतः मासे व चिकनचा खराब माल टाकला जात असल्याने परिसराच्या स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नदीच्या परिसरात अशा प्रकारे कचरा टाकणे पर्यावरणाच्यादृष्टीनेही चिंताजनक आहे.
----
रास्तारोकोचा इशारा
पथदिवे नसल्यामुळे या प्रकारांवर नियंत्रण ठेवणे कठीण होत असल्याचे मुकादम यांनी निदर्शनास आणून दिले. पुलावरील पथदिव्यांचा प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास रास्तारोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Strict Action : मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग अन् भेसळीला पूर्ण बंदी! आयुक्त तुकाराम मुंढेंकडून कडक नियमावली जारी; नियम मोडल्यास थेट कारवाई

Neha Bora: 'सीजेपी'च्या पत्रकार परिषदेत गोंधळ अन् घोषणाबाजी; आंदोलनाची पुढची दिशा केली स्पष्ट

Latest Marathi News Update: लैंगिक शोषणप्रकरणी कोऱ्हाळे खुर्द येथील तरुणावर गुन्हा

Medical Courses : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी शुक्रवारपर्यंत मुदतवाढ

नाना पाटेकरांनी सिंहगडाच्या पायथ्याशीच फार्महाऊस का बांधलं? पुरुषोत्तम बेर्डेंनी सांगितलं कारण, म्हणालेले- इथून महाराजांचे...

SCROLL FOR NEXT