rat१६p३१.jpg-
26O70578
तुळशी : वनराई बंधारे मोहिमेत सहभागी होत जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांनी जलसंवर्धनाचा संदेश दिला. या वेळी उपस्थित गटविकास अधिकारी राजेंद्र आंधळे, तुळशी महिला व ग्रामस्थ.
-----
टंचाईचे संकट लवकरच गडद होणार
अस्मिता केंद्रे ः पाणी अडवून भूजलपातळी वाढवण्यावर भर
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १६ : ‘‘यंदा पाणीपातळी झपाट्याने खालावत असल्याने एप्रिल-मे महिन्यात जाणवणारी पाणीटंचाई फेब्रुवारीपासूनच जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ग्रामपंचायतींनीही उपलब्ध निधीतून पाणी संवर्धनाच्या कामांना प्राधान्य द्यावे,’’ असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांनी केले.
तुळशी येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर व्हावा असा उल्लेख करताना, पावसाअभावी शेतीचे झालेले नुकसान आणि पाण्याची खालावणारी पातळी याबाबत अध्यक्षांनी चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या, पिकांच्या लोंब्यांमध्ये दाणे पूर्णपणे भरले नसल्याची प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्यानंतर दुष्काळाची तीव्रता लक्षात येते. जिल्ह्यातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन छोटे-छोटे वनराई बंधारे उभारावेत. अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांनी समन्वयाने काम केल्यास पाणीटंचाईच्या संकटावर मात करता येऊ शकते. पाणी वाचवणे म्हणजे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी केलेला महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे, असेही त्यांनी नमूद केले. सण-उत्सवकाळातही जलसंधारणाच्या कामात सहभागी होणाऱ्या ग्रामस्थांचे त्यांनी कौतुक केले. गावागावांवरील पाणीटंचाईचे संकट दूर व्हावे आणि भविष्यातील अन्नधान्याच्या प्रश्नावरही मात करता यावी, यासाठी अंबेमातेच्या आणि ग्रामदेवतेच्या चरणी प्रार्थना करत असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी गटविकास अधिकारी राजेंद्र आंधळे, विस्तार अधिकारी पवन गोसावी, तुळशी गावाचे शिक्षक, विद्यार्थी, आरोग्यसेवक, अंगणवाडी सेविका, महिला, ग्रामस्थ व अधिकारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.