कोकण

किनाऱ्यावरील कॉंक्रीटीकरणाचा सागरी परिसंस्थेवर

CD

rat१६p३३.jpg-
26O70580
रत्नागिरी : अयान बॅनर्जी याला आसमंत फाउंडेशनतर्फे पुस्तके भेट देताना संशोधक डॉ. विशाल भावे.
---
काँक्रिटीकरणाचा सागरी परिसंस्थेवर परिणाम
अयान बॅनर्जी ः पर्यावरण शाश्वतता, जबाबदार जीवनशैलीसाठी पदयात्रा
सकाळ वृत्तेसवा
रत्नागिरी, ता. १६ : ‘‘पदयात्रेदरम्यान किनारपट्टीवर अनेक बांधकामे पाहायला मिळाली. यामुळे काही ठिकाणी किनाऱ्यांचे काँक्रिटीकरण होत आहे. याचा परिणाम सागरी परिसंस्थेवर होऊ शकतो. सागरी जैवविविधता जपली पाहिजे याकरिता चळवळ उभी केली पाहिजे, ज्यामुळे किनारी परिसंस्थेचे खऱ्या अर्थाने रक्षण होऊ शकेल,’’ असे मत भारतभ्रमण पदयात्रा करणारा अयान बॅनर्जी याने व्यक्त केले.
पर्यावरणीय शाश्वतता, करुणा आणि जबाबदार जीवनशैलीचा प्रसार करण्यासाठी अयन बॅनर्जी हा युवक भारतभर सात हजार किलोमिटरची पदयात्रा करत आहे. नुकताच तो रत्नागिरीत येऊन गेला. पर्यावरण शाश्वतता, प्राणी कल्याण आणि सेंद्रिय शेतीसारख्या पारंपरिक पद्धतींचा प्रचार करण्यासाठी २४ वर्षीय अयानने मार्च महिन्यात सुंदरबन येथून भारतभ्रमण पदयात्रा सुरू केली. दररोज ३५ ते ४५ किलोमीटर अंतर पार करतो. त्याने आतापर्यंत पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ, गोवा पार करून तो सिंधुदुर्गमधून रत्नागिरीत दाखल झाला. ही पदयात्रा यावर्षी डिसेंबर २०२६ मध्ये गुजरातमध्ये समाप्त होणार आहे. गोव्यापर्यंत त्याने सात हजार बियाण्यांची पाकिटेही वितरित केली. संस्थेचे संस्थापक नंदकुमार पटवर्धन यांनी रत्नागिरीत अयानला चांगले सहकार्य केले. या दरम्यान आसमंत फाउंडेशनच्या संचालिका डॉ. अमृता भावे आणि त्यांचे संशोधक डॉ. विशाल भावे यांच्याशी संवाद साधला.
डॉ. भावे दाम्पत्याचे संशोधन आणि आवडीचे क्षेत्र प्रामुख्याने सागरी आणि किनारी जैवविविधतेशी संबंधित आहे. वाढते बांधकाम आणि समुद्रकिनाऱ्यांचे होणारे काँक्रिटीकरण यांचा सागरी परिसंस्थेवर, विशेषतः समुद्री कासवांच्या अंडी घालण्याच्या अधिवासावर होणारा परिणाम यावर चर्चा करण्यात आली. समुद्री कासवे अंडी घालण्यासाठी योग्य अशा वालुकामय किनाऱ्यांवर अवलंबून असतात. वाळूची स्थिती आणि तिचे स्वरूप, किनाऱ्याचे एकूण पर्यावरण, कासवांचे अंडी घालणे आणि अंडी व पिल्लांचे जगणे यांवर प्रभाव टाकू शकतात. बांधकाम आणि काँक्रीटीकरणामुळे या अधिवासांमध्ये बदल होऊ शकतात तर अयोग्य नियोजनामुळे किनाऱ्यावरील नैसर्गिक प्रक्रियांत व्यत्यय येऊ शकतो या संबंधी चर्चा झाली.
-----
आसमंतच्या उपक्रमांचे कौतुक
आसमंत जैवविविधता उद्यानासंबंधीची माहिती अयानने घेतली. अकरा वर्षांपूर्वी स्थापन केलेले हे जुने पर्यावरण संवर्धन राखीव क्षेत्र आहे. या उद्यानात आणि त्याच्या आसपासच्या हिरवळीच्या भागात स्थानिक हंगामी वनस्पती, दुर्मिळ व नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या स्थानिक वनस्पतींच्या प्रजाती, पावसाळ्यातील वनस्पती आणि वन्यजीवांच्या घरट्यांची व अधिवासांची जोपासना केली जाते. संस्थेच्या खारफुटीची लागवड, बियाणे संवर्धन आणि सागरी परिसंस्थेबद्दल जागरूकता वाढवणाऱ्या उपक्रमांचा मी प्रसार करेन, अशी ग्वाही अयानने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Protest Controversy : "सीजेपीच्या आंदोलनामागे अमेरिकन अब्जाधीश इलॉन मस्कचा हात!"; भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांचा खळबळजनक आरोप

१७ ऑक्टोबरला सूर्याचं राशीपरिवर्तन; मेष राशीसह ६ राशींचं नशीब पालटणार? मिळू शकतो मोठा फायदा

Marathi News Live Updates: 'लहरा दो तिरंगा' मोर्चाच्या १० मिनिटे आधी हायव्होल्टेज ड्रामा; अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात

ना श्रीराम ना माधुरी; 'ही' आहे धकधक गर्लच्या घराची नेमप्लेट, फराह खानसुद्धा झाली अवाक

CJP Tiranga March : अभिजीत दीपके पोलिसांच्या ताब्यात; ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनापूर्वी दिल्ली पोलिसांची कारवाई, दिल्लीत मोठा पोलीस बंदोबस्त

SCROLL FOR NEXT