तुरळ धोंगडवाडीत पथदीप बंद
महावितरणचे दुर्लक्ष; नवरात्रोत्सवात गैरसोय
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १६ ः तालुक्यातील तुरळ धोंगडवाडी येथे गेल्या आठ दिवसांपासून पथदीप (स्ट्रीटलाईट) बंद असल्याने ग्रामस्थांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. सध्या नवदुर्गा उत्सवाचे कार्यक्रम सुरू असतानाही परिसरातील पथदिवे बंद असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. वारंवार तक्रारी करूनही अद्याप पथदिप सुरू केलेले नसल्याने महावितरणच्या कारभाराबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे.
तुरळ धोंगडवाडी परिसरात नवदुर्गा उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांसाठी रात्रीच्या वेळी ग्रामस्थ व भाविकांची ये-जा सुरू असते; मात्र, गेल्या आठ दिवसांपासून स्ट्रीटलाईट बंद असल्याने रात्रीच्यावेळी परिसरात अंधार पसरत आहे. त्यामुळे नागरिकांना तसेच उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पथदीप सुरू करण्यासाठी संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत; मात्र, त्यानंतरही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. उत्सवकाळात तरी पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी होत आहे. पथदीप तातडीने सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना विभागप्रमुख अरविंद जाधव यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.