rat1p3.jpg-
73524
चिपळूण - सावर्ड येथे घेण्यात आलेल्या शिबिरात मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद सदस्य पूजा निकम.
सावर्डे वहाळ फाटा वस्तीगृहात
विद्यार्थिनींसाठी आरोग्य शिबिर
चिपळूण, ता. २ ः "आपल्या सर्वांचे आरोग्य उत्तम राहणे हीच समृद्ध गावाची ओळख आहे. वस्तीगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींनी आरोग्याकडे दुर्लक्ष न करता वेळोवेळी तपासणी करून घेणे गरजेचे आहे. चांगले आरोग्य असेल तरच शिक्षणात उत्तम ऊर्जा मिळेल. त्यामुळे आरोग्याची उत्तम काळजी, परिसराची स्वच्छता आणि सकस आहार ही आजची काळाची गरज आहे," असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या सौ. पूजा निकम यांनी केले.
जिल्हा परिषद रत्नागिरी आरोग्य विभाग आणि आयुष्मान आरोग्य मंदिर, प्राथमिक आरोग्य केंद्र सावर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने ''माझं गाव आरोग्य संपन्न गाव'' अभियानांतर्गत सावर्डे वहाळ फाटा येथील समाजकल्याण वस्तीगृह आणि फार्मसी कॉलेजच्या वस्तीगृहातील विद्यार्थिनींसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर नुकतेच पार पडले. या शिबिरात विद्यार्थिनींना ''माझं गाव आरोग्य संपन्न गाव'' अभियानाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. किरकोळ आजारांकडे दुर्लक्ष न करता वेळीच तपासणी केल्यास भविष्यातील गंभीर आजार टाळता येऊ शकतात, असे आवाहन करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र सावर्डे येथील समुदाय आरोग्य अधिकारी स्वाती सालवाड यांनी कर्करोग प्रतिबंधात्मक उपाय आणि आरोग्याची काळजी घेण्याबाबत विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले. या शिबिरात विद्यार्थिनींची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली असून, प्रामुख्याने रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या विविध चाचण्या करण्यात आल्या. तसेच गरजेनुसार विद्यार्थिनींना मोफत औषधोपचार व गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.