हरकती दाखल
करण्यास प्रारंभ
रत्नागिरी ः भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) २०२६ जाहीर झाला आहे. ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, सध्या दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी सुरू आहे. यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोबरपर्यंत होती; मात्र त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी १३ नोव्हेंबर, नोटीस कालावधी किंवा दावे व हरकती निकालात काढणे यासाठी २५ नोव्हेंबर, अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी ३० नोव्हेंबरला होणार आहे. मतदारांनी मतदार यादीतील आपले नाव, पत्ता, वय आणि जन्मतारीख यांसारख्या तपशिलांची खात्री करून घ्यावी. नोंदींमध्ये काही दुरूस्ती आवश्यक असल्यास विहित नमुन्यात अर्ज सादर करावा. नवमतदारांनी तसेच प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांनी या वाढीव मुदतीचा लाभ घेऊन अंतिम मतदार यादीत आपले नाव नोंदवून घ्यावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी सर्व नागरिकांना केले आहे. ''सिटिजन सर्व्हिस पोर्टल'' (voters.eci.gov.in) किंवा ''ECINet'' मोबाइल ॲपद्वारे ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे.
----------
संचालकपदी
सारिका खेडेकर
चिपळूण : चिपळूण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत सारिका खेडेकर यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली. या वेळी आमदार निकम म्हणाले की, खेडेकर या सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. त्यांच्यासारख्या कर्तृत्ववान आणि अभ्यासू महिलेची बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड होणे, ही सहकार क्षेत्रातील महत्त्वाची बाब आहे. या वेळी खेडेकर कुटुंबीयांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद कापडी, समीर जानवलकर, रत्नागिरी जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष सचिन साडविलकर, वरूण (दादू) गुडेकर, संदीप जागुष्टे, विजय भुवड, रघुनाथ भालेकर आदी उपस्थित होते.
--------
जनजातीय गौरव दिन
पंधरवडा सुरू
रत्नागिरी ः भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आणि आदिवासी समुदायांच्या ऐतिहासिक योगदानाचा सन्मान करण्यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार देशभरात १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत ‘जनजातीय गौरव दिन’ (पंधरवडा) साजरा करण्यात येत आहे. या अभियानामध्ये व्होल ऑफ गर्व्हन्मेंट आणि व्होल ऑफ इंडिया या दृष्टिकोनातून सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आले आहे. या पंधरवड्यानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी वस्तींमध्ये ग्रामीण पिण्याच्या पाण्याच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचे उद्घाटन किंवा भूमीपूजन करणे तसेच वैयक्तिक कुटुंब नळजोडणी वितरित केली जाणार आहे. याशिवाय सुरक्षित पिण्याचे पाणी आणि पाणी गुणवत्ता तपासणीबाबत जनजागृती मोहीम राबवली जाईल. ग्रामपाणी व स्वच्छता समिती, पाणी समिती व आदिवासी युवक, महिला यांच्यासाठी संचालन व देखभाल याबाबत गावस्तरावर प्रशिक्षण व क्षमता बांधणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.