ratchl२२.jpg
७३७९३
चिपळूण ः खेर्डी कातळवाडी पाणीप्रश्नाबाबत पालकमंत्र्यांना माहिती देताना उमेश खताते.
--------------
खेर्डी कातळवाडीचा
पाणीप्रश्न सुटण्याच्या आशा
२६ लाखांचे अंदाजपत्रक तयार; पाणीपुरवठा विभागाला कार्यवाहीचे निर्देश
चिपळूण, ता. २ : खेर्डी येथील डोंगराळ भागात वसलेल्या कातळवाडीचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. सध्याची दोन इंची पाइपलाइन बदलून तीन इंची पाइपलाइन टाकण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, त्यासाठी २६ लाख रुपयांचे अंदाजपत्रक बनवण्यात आले आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाला याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
खेर्डी कातळवाडी ही गावापेक्षा उंचावर आणि डोंगराळ भागात वसलेली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना वारंवार पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. ग्रामपंचायतीच्या बोरवेलमधून पाणीपुरवठा होत असला तरी उपलब्ध यंत्रणा अपुरी पडत आहे. यंदाच्या गणेशोत्सवातही नागरिकांना पाण्यासाठी धावपळ करावी लागली होती. या समस्येची दखल घेत युवासेना सरचिटणीस उमेश खताते यांनी पालकमंत्री सामंत यांच्याकडे कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी केली. त्यानंतर पंचायत समितीचे उपसभापती संदेश आयरे यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणी व सर्वेक्षणासाठी पाठवले. या सर्वेक्षणात दोन इंचीऐवजी तीन इंची पाइपलाइन टाकल्यास पाणीपुरवठा अधिक सुरळीत होऊ शकतो, असे स्पष्ट झाले. त्यानुसार २६ लाखांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. खताते यांनी अंदाजपत्रक आणि आवश्यक कागदपत्रांसह पालकमंत्र्यांची भेट घेऊन प्रश्नाची सविस्तर माहिती दिली. त्यावर सामंत यांनी संबंधित विभागाला तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रस्तावित कामाला मंजुरी मिळून पाइपलाइनचे काम लवकर सुरू व्हावे, अशी अपेक्षा कातळवाडीतील ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.