cholarship student responsibility on teachers esakal
कोकण

Raigad News : शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांची जबाबदारी ‘आदर्श’ शिक्षकांवर

प्रत्‍येक तालुक्‍यात मार्गदर्शन कार्यशाळा, सराव परीक्षा

सकाळ वृत्तसेवा

Mahad News : रायगड जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी राज्य शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्य व जिल्हा गुणवत्ता यादी चमकावेत या दृष्टीने शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील आदर्श शिक्षकांवर जबाबदारी टाकण्यात आली असून शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्‍या विद्यार्थ्यांची कार्यशाळाही नुकतीच पार पडली.

राज्य सरकारच्या पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी व अधिकाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकवावेत यासाठी हा प्रयत्न सुरू आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्‍थ्‍यांची संख्याही कमी असते तसेच निकालही कठीण असल्याने पालक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेपासून दूर ठेवतात. याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी आता विशेष पुढाकार घेतला आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादी स्थान देण्यासाठी त्‍यांनी या परीक्षेवर विशेष भर दिला आहे. रायगडमध्ये जिल्हास्‍तरीय तसेच राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांची संख्या मोठी आहे.

आदर्श शिक्षकांचे मार्गदर्शन शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये बसणाऱ्या मुलांना मिळावे, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ही संकल्‍पना राबवली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱ्या प्रत्येक तालुक्यातील विद्यार्थ्यांची जबाबदारी त्या त्या तालुक्यातील आदर्श पुरस्कार विजेत्या शिक्षकांवर देण्यात आली आहे.

त्या दृष्टीने या विद्यार्थ्यांची पहिली कार्यशाळा व परीक्षाही नुकतीच पार पडली आहे. या परीक्षेमधून ६० टक्के पेक्षा अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील कार्यशाळा व परीक्षेमध्ये सहभाग घेता येणार आहे.

खासगी शाळेतील विद्यार्‍थ्‍यांनाही फायदा

जिल्हा शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलांवर विशेष लक्ष देऊन त्यांना शिष्यवृत्ती परीक्षा बाबत मार्गदर्शन तसेच सराव करून घेतला जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील किमान ३०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच खासगी शाळेतील विद्यार्थ्यांनाही याचा फायदा होईल. आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांवर आता आदर्श हुशार विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी आली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून रायगड जिल्ह्यातील शाळांमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शनाचा उपक्रम राबवला जात आहे. आदर्श पुरस्कार विजेत्या शिक्षकांच्या सहकार्याने जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक व गुणवत्ता यादीत यावेत यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत.
- पुनिता गुरव, शिक्षणाधिकारी, रायगड जिल्हा परिषद

जिल्‍हा परिषदेचा नवीन संकल्‍प

३०० गुणांची ही शिष्यवृत्ती परीक्षा अवघड श्रेणीमध्ये असते. निकषानुसार पाचवीतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना वार्षिक पाच हजार रुपये तर आठवीतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना वार्षिक साडेसात हजार रुपये शिष्यवृत्ती राज्य शासनाकडून दिली जाते. जास्‍तीत जास्‍त विद्यार्‍थ्‍यांना शिष्‍यवृत्ती परीक्षेत यश मिळावे, यासाठी जिल्‍हा परिषदेकडून नवीन संकल्‍प हाती घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

Solapur Crime: सोलापुरात धक्कादायक प्रकार! डॉ. वळसंगकरांचे जावई सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’, पोलिसांत गुन्हा; अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन्‌ छळाचा आरोप

PMOS वर घरगुती उपाय शोधताय? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली 'या' पाण्याची हेल्थ टिप, नक्की ट्राय करा

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT