कोकण

Raigad News: गितेंना बसणार धक्का?; अंतुलेंचे जावई मुश्ताक अंतुले राष्ट्रवादीच्या वाटेवर

CD

Sunil tatkre News: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा दिवंगत नेते बॅ. ए. आर. अंतुले यांचे जावई आणि काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

त्यांनी स्वतः या वृत्ताला दुजोरा देत येत्या सोमवारी पक्षप्रवेश होणार असल्याचेही ते म्हणाले. ऐन लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीला हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

काँग्रेसचे कट्टर समर्थक असलेले मुश्ताक अंतुले हे सुनील तटकरे यांचे जवळचे मित्र आहेत. मुश्ताक अंतुले हे काँग्रेसचे निष्ठावान नेते म्हणून ओळखले जाता. गेल्या कित्येक वर्षांपासून ते काँग्रेसचे काम करत आहेत. बॅ. ए. आर. अंतुले यांचे ते उत्तराधिकारी म्हणून समजले जातात. इंडिया आघाडी स्थापन झाल्यानंतर या आघाडीत काही काळ ते सक्रिय होते.

मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी विरोधकांच्या तंबूत जात असल्याचे जाहीर केल्याने जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. काँग्रेस नेते त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी महाराष्ट्रात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे.

मध्यंतरीच्या कालावधीत त्यांचा मतदारसंघातील वावर खूपच कमी झाला होता. त्यामुळे त्यांच्याबरोबर किती कार्यकर्ते जातील, याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. मुश्ताक अंतुले हे अल्पसंख्याक समाजातून येतात. अंतुले यांच्या प्रवेशामुळे रायगड मतदारसंघातील अल्पसंख्याक मतदार महायुतीकडे वळविण्यात लाभ होईल, असे बोलले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर 'नंदा देवी' मोठ्या दिमाखात भारतात दाखल! तुमच्या घरातला गॅसचा प्रश्न सुटला...

पत्नी देवीशाचा एक प्रश्न अन् सूर्यकुमार यादवच्या कारकीर्दिला मिळाली कलाटणी; T20 World Cup विजेत्या कर्णधाराने अखेर सिक्रेट सांगितले

Gas Cylinder Shortage : अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर देवस्थानचे अन्नछत्र बंद; भाविकांच्या अन्नाचा प्रश्न ऐरणीवर, प्रसादाचा लाडू सुद्धा बंद

Gold Investment: युद्ध सुरू असतानाही सोन्याचे भाव का पडले? शेअर बाजार कोसळला तरी सोनं स्वस्त का? पुढे काय होणार? तज्ज्ञांचे मत

Latest Marathi News Live Update : मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT