कोकण

कारमध्ये गुदमरून चिमुकल्यांचा मृत्यू

CD

मोटारीमध्ये गुदमरून
चिमुकल्यांचा मृत्यू 
मुंबई, ता. २५ : अँटॉप हिल परिसरातील सेक्टर पाच येथे कारमध्ये गुदमरून बहीण-भावाचा मृत्यू झाला. साजिद मोहम्मद शेख (वय ७) आणि रीना मोहम्मद शेख (वय ५) अशी त्या दोघांची नावे आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अँटॉप हिल परिसरातील सेक्टर पाच येथे एका झोपडीत साजिद आणि रीना आपल्या आई-वडिलांसोबत राहत होते. बुधवारी दुपारी दीड वाजल्यापासून मुले दिसली नाहीत म्हणून आईने शोधाशोध केली; परंतु ती मुले जवळपास कुठेही आढळली नाहीत. त्यानंतर कुटुंबीयांनी अँटॉप हिल पोलिस ठाण्यात मुले हरवल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांकडून व कुटुंबीयांकडून या दोघांचा शोध सुरू करण्यात आला. पोलिसांना शोध घेताना एका कारमध्ये दोघांचे मृतदेह सापडले. घरापासून ५० मीटर अंतरावर ही कार होती. खेळता खेळता गाडीत अडकून गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. अँटॉप हिल पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईला जायचं फायनल! ४ मुक्काम, ५ दिवस; बीड-नगर-पुणे-मुंबई, कसा असेल मार्ग? जरांगेंनी सांगितला प्लान

बापरे! अमीषा पटेलच्या आईच्या घरातून डायमंड डायमंडचे दागिने चोरीला; घरातील हाऊस हेल्पला अटक

Kolhapur Farmer Loan Waiver Second List : शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर! जिल्ह्यातील 3,833 शेतकऱ्यांना दिलासा; तुमचे नाव आहे का?

Marathi News Live Updates : मुंबईत महिलांनी अमृताताई आणि लताताईंच्या घरी जाऊन हळदी कुंकू लावा : जरांगे पाटील

Rishi Panchami 2026: ऋषी पंचमी महिलांसाठी खास का असते? १०८ वेळा आघाड्याच्या काडीने दात घासण्यामागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT