कोकण

रामशेठ ठाकूरांमुळे विमानतळाचे काम पूर्ण

CD

रामशेठ ठाकूर यांच्यामुळे विमानतळाचे काम पूर्ण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ः ठाकूर यांचा अमृतमहोत्सवी अभीष्टचिंतन सोहळा
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १४ ः स्थानिक भूमिपुत्रांच्या आंदोलनामुळे विमानतळाचे काम पुढे जात नव्हते; मात्र रामशेठ ठाकूर यांनी सरकार आणि भूमिपुत्रांमध्ये योग्य समन्वय घडवून आणला. त्यामुळे अनेक वर्षे रखडलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्यामुळे पूर्णत्वास आले, असे गौरवोद्‍गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी अभीष्टचिंतन निमित्ताने उलवे येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘रामशेठ ठाकूर एकलव्याप्रमाणे रयत शिक्षण संस्थेला गुरुदक्षिणा देत राहिले. मुंबईनंतरची सर्वांत मोठी तिसरी मुंबई ही नवी मुंबई आणि रायगड भागात तयार होत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डेटा सेंटर आणि नोकऱ्या येत आहेत. विकसनशील नवी मुंबईचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा रामशेठ ठाकूर यांचे नाव ठळक अक्षरात असेल.’’
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी रामशेठ ठाकूर यांच्या सायन-पनेवल महामार्ग तथा जेएनपीएचे एक कंत्राटदार ते लोकनेता या प्रवासावर प्रकाश टाकला. समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण या तीन तत्त्वांवर रामशेठ यांनी खरे राजकारण केले. जनतेचा निःस्वार्थ विकास करणारे नेतृत्व असेल, तर त्यांना बॅनर लावून निवडणूक लढविण्याची गरज पडत नाही, असे गडकरी म्हणाले. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नूतन शाळेत जाऊन रामशेठ यांचे अभीष्टचिंतन केले.
दरम्यान, यावेळी रामशेठ ठाकूर यांच्या आयुष्याचा धांडोळा घेणाऱ्या ‘रामपर्व’ विशेषांकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

निवृत्त होण्यात वेगळी मजा!
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी रामशेठ ठाकूर हे ५२ व्या वर्षी अचानक राजकारणातून निवृत्त का झाले, असे विचारताना खासदार सुनील तटकरे यांचे नाव घेता माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांचा किस्सा सांगितला. गावसकर फॉर्मात असताना त्यांनी घेतलेली निवृत्ती अनेकांच्या जिव्हारी लागली. निवृत्त होण्यात वेगळीच मजा आहे; पण जेव्हा लोक निवृत्त कधी होणार असे विचारतात, तेव्हा त्यांची अपेक्षा आपण लक्षात घेतली पाहिजे, असे गावसकर म्हणाले होते. सध्या राजकारण अतृप्त आत्म्यांचे घर बनले आहे. फेविकॉलप्रमाणे सर्व जण खुर्चीला चिकटून बसले आहेत, असे गडकरी यांनी सांगताच एकच हशा पिकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT