‘महारेरा’ सक्षमता प्रमाणपत्र प्रशिक्षण
पुणे, ता. ९ : प्रशिक्षण व प्रमाणपत्र नसणाऱ्या रिअल इस्टेट एजंटवर कारवाई करत त्यांची एजंट नोंदणी रद्द करण्याचा आदेश ‘महारेरा’ने दिला आहे. ‘महारेरा’ने आता नवीन एजंट नोंदणी व नूतनीकरण बंद केले आहे. यापुढे एजंटकडे सक्षमता प्रमाणपत्र असेल तरच नवीन नोंदणी करता येईल अथवा मुदत संपलेल्या नोंदणीचे नूतनीकरण करता येईल. ज्या नोंदणीकृत एजंटकडे सक्षमता प्रमाणपत्र नाही, त्यांची रेरा नोंदणी ‘महारेरा’ने रद्द केलेली आहे. नोंदणीकृत रेरा एजंट होण्यासाठी २० तासांचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवणे अत्यावश्यक आहे. ‘एसआयआयएलसी’तर्फे होणाऱ्या प्रशिक्षणाची ऑनलाईन व ऑफलाईन बॅच १४ ऑक्टोबरला सुरू होत आहे.
संपर्क : ८४८४८२२८५५
बेसिक टू ॲडव्हान्स सी प्रोग्रॅमिंग कोर्स
प्रोग्रॅमिंग शिकायची इच्छा असणाऱ्यांसाठी ६० तासांचा बेसिक टू ॲडव्हान्स सी प्रोग्रॅमिंग कोर्स १४ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. ‘सी’ ही एक सोपी आणि शक्तिशाली प्रोग्रॅमिंग भाषा आहे. अगदी नवशिक्यांना देखील या कोर्सद्वारे ही भाषा शिकता येऊ शकते. कोर्समध्ये डेटा टाइप्स, कंट्रोल स्ट्रक्चर, फंक्शन्स आणि ॲरे यासारखे महत्त्वाचे विषय शिकवले जाणार आहेत. तज्ज्ञ शिक्षक प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. कोर्स पूर्ण झाल्यास सहभागी स्वतः सोपे प्रोग्रॅम लिहू शकतील. सहभागींना प्रमाणपत्र मिळेल. टेक्नॉलॉजी क्षेत्रात करिअर सुरू इच्छिणाऱ्यांसाठी किंवा काही नवीन शिकायची इच्छा असणाऱ्यांसाठी कोर्स उपयुक्त आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
डिहायड्रेशन व्यवसाय प्रशिक्षण
डिहायड्रेशन केलेल्या प्रक्रिया पदार्थांना स्थानिक व परदेशातही वाढती मागणी आहे. यातील व्यवसाय संधींविषयी मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण थेट इंडस्ट्रीत १९ व २० ऑक्टोबरला आयोजिले आहे. प्रशिक्षणात डिहायड्रेशन म्हणजे काय, या तंत्रज्ञानाचे महत्त्व, उपयोग, व्यवसाय म्हणून तो कसा करावा, डिहायड्रेशनचे प्रमुख घटक, वेगवेगळ्या पद्धती, निर्जलीकरणाद्वारे तयार होणारे घटक पदार्थ व त्याचे उपयोग, उत्पादन व मार्केट कॉस्ट, निर्जलीकरणासाठी लागणाऱ्या मशिनरी, त्याचा फ्लो चार्ट, बाजारपेठ, मार्केटिंगची पद्धत, शासकीय योजना व अनुदान, युनिट उभारण्यासाठी जागेची निवड, गुंतवणूक, प्रोजेक्ट रिपोर्ट आदी विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. फळभाज्या, पालेभाज्या, कंद, पानवर्गीय वनस्पती, आयुर्वेदिक वनस्पती, फळे, दुग्धजन्य पदार्थ, मांस, मच्छी, चिकन या पदार्थांचे प्रात्यक्षिक होणार आहे. प्रक्रिया उद्योजक, पदवीधर विद्यार्थी, गृहिणी आदींसाठी कार्यशाळा उपयुक्त आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
‘एफपीसी’ व्यवस्थापन व प्रशिक्षण
शेतकरी कंपन्यांचे व्यवस्थापन कसे करावे, सीईओ व अन्य अधिकाऱ्यांची नियुक्ती कोणत्या निकषांवर करावी, कंपनी व्यावसायिक तत्चावर कशी चालवावी, नियमित लेखापरीक्षण व बुक कीपिंग कसे करावे, याबाबत मार्गदर्शन करणारे तीन दिवसीय प्रशिक्षण २०, २१ व २२ ऑक्टोबरला आयोजिले आहे. ‘एफपीसी’मध्ये कार्यरत संचालक, कर्मचारी व सभासद, ‘एफपीसी’ नोंदणीसाठी इच्छुक शेतकरी यांच्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त आहे. प्रशिक्षणात शेतकरी उत्पादक कंपनी आणि संचालक मंडळाचे व्यवस्थापन, कंपनी व्यवसाय नियोजन व बाजार जोडणी, कृषिमूल्य व व्यवसाय साखळी व्यवस्थापन आणि नियोजन, कंपनी वित्त व्यवस्थापन व बुक कीपिंग, आरओसी अनुपालनाचा दंड कसा टाळावा, जीएसटी कराचे नियोजन कसे करावे आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८२२३७७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.