कोकण

शिका जर्मन भाषा

CD

शिका जर्मन भाषा
पुणे, ता. २९ : जर्मन ही अशी आंतरराष्ट्रीय भाषा जी शिकल्याने भरपूर करिअर संधी उपलब्ध होतात. याचे कारण जर्मनी ही युरोपची सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आहे. जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त असे अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँड आणि कॉर्पोरेशन हे जर्मन आहेत. भारत ही त्यांची वाढती बाजारपेठ असल्याने जर्मन भाषा अनुवादक, जर्मन दुभाषी आणि जर्मन प्रशिक्षकांना भारतात नेहमीच मागणी होती आणि पुढेही राहणार आहे. जर्मन शिकल्याने रेझ्युमेला वजन प्राप्त होते आणि नोकरीच्या बाजारपेठेतील रोजगार क्षमता वाढते. जर्मनीमध्ये जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या संधीही उपलब्ध आहेत. या सर्व संधींचा लाभ घ्यायची इच्छा असणाऱ्यांसाठी जर्मन भाषा शिकण्याची संधी उपलब्ध होत आहे. जर्मन भाषेचा ६० तासांचा (लेव्हल ए १) प्रमाणपत्र अभ्यासक्रम १५ मेपासून सुरू होत आहे. एकूण तीन टप्प्यांमध्ये हा अभ्यासक्रम स्टेप-बाय-स्टेप होणार आहे.
संपर्क : ९८८१०९९४२६


वक्ता प्रशिक्षण कार्यशाळा
सभेत प्रभावीपणे कसे बोलावे, यासाठीची कार्यशाळा येत्या रविवारी (ता. ५) आयोजित केली आहे. चालू वर्ष राजकीय धामधुमीचे असणार आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून नेत्यांना संभाषण कौशल्याची, छोट्या सभांना संबोधित करण्याची गरज पडणार आहे. उत्तम कार्यकर्ता जेव्हा वक्तृत्व कौशल्य आत्मसात करेल, तेव्हा त्याचे या क्षेत्रात नाव होऊ शकेल. म्हणूनच वक्तृत्व कौशल्ये विकसित करण्यासाठीची कार्यशाळा आयोजित केली आहे. गेली २५ वर्षे हजारो सभांमधून व्याख्याने आणि भाषणांचा समृद्ध अनुभव असलेले प्रा. विजय नवले यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत भाषणाची तयारी, मुद्दे, मुद्यांचा क्रम, श्रोत्यांची मानसिकता, वक्तृत्व शैली, ओघवती वाणी, मिश्किलपणा, सभा जिंकणे, सुरुवात, किस्से, उदाहरणे, मनोगत, आभार, प्रस्तावना, भाषणाचा शेवट आदी भाषणाच्या कौशल्यांबाबत मार्गदर्शन होणार आहे. व्याख्यानापासून भाषणापर्यंत, चौक सभेपासून जाहीर सभेपर्यंत, चॅनेल्सना आणि पत्रकारांना बाईटस्‌ देण्यापासून रिल्स करण्यापर्यंतचे प्रशिक्षण यामध्ये देण्यात येणार आहे. मांडणी, प्रात्यक्षिके, शंका निरसन, सादरीकरण या माध्यमातून हे प्रशिक्षण पार पडेल.
संपर्क : ९१४६०३८०३१

इन्स्टंट पीठे व इन्स्टंट प्रीमिक्स
सध्याच्या धावपळीच्या युगात इन्स्टंट फूडला बाजारपेठेमध्ये खूप मागणी आहे. हे लक्षात घेऊन इन्स्टंट पीठे व इन्स्टंट फूड प्रीमिक्स तयार करण्यास शिकवणारी एकदिवसीय प्रात्यक्षिकावर आधारित कार्यशाळा येत्या शनिवारी (ता. ४) आयोजित केली आहे. यामध्ये इन्स्टंट इडली पीठ, डोसा पीठ, उडीद वडा, गुलाबजामून, आइस्क्रीम, फालुदा, नाचणी डोसा, नाचणी इडली, रबडी, तंदूर, ढोकळा, चटणी, मंचुरियन, केक, पकोडा हे प्रीमिक्स पदार्थ कृतीसह शिकवले जातील. या उत्पादनांना बाजारपेठेत असलेल्या संधी, प्रॉडक्ट मार्केटिंग, कॉस्टिंग, पॅकिंग, लेबलिंग, आवश्यक मशिनरी आदींविषयी तज्ज्ञ गंधाली दिंडे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळा पूर्ण केल्यास नोट्स व डिजिटल प्रमाणपत्र मिळेल.
संपर्क : ९३५६९७३४२७

वरील सर्व कार्यशाळा व प्रशिक्षणे सशुल्क असून त्यांचे ठिकाण ः सकाळ मीडिया सेंटर, सकाळ नगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वाघ किंवा बिबट्या गावात येताच मोबाईलवर येणार अलर्ट; नागपुरात नवी यंत्रणा सुरू, AI हिंस्त्र प्राण्यांचा धोका कसा ओळखणार?

IPL 2026 Marathi News: गतविजेत्या RCB ला स्पर्धा सुरू होण्यापूर्वी झटका! प्रमुख खेळाडूच्या खेळण्यावर अनिश्चिततेचे सावट

Nagpur News: मेयोतील कॅन्टीन बंद, मेडिकलमध्ये शिजली खिचडी; रविभवन कॅन्टीनमध्ये इलेक्ट्रिक शेगड्यांचा आधार

Gas Shortage: हॉटेल व्यावसायिकांसाठी मोठा निर्णय! कमर्शियल सिलिंडरचा कोटा २० टक्के, पण 'यांनाच' मिळेल गॅस

EPFO PF Account: नोकरी बदलली? जुन्या PF खात्यातील पैशांची चिंता करू नका; ‘फॉर्म 13’ करेल सगळी मदत

SCROLL FOR NEXT