क्लाऊड किचनमध्ये व्यावसायिक स्वयंपाकघराचा वापर केवळ डिलिव्हरी किंवा टेकआउटसाठी अन्न तयार करण्याच्या उद्देशाने केला जातो. पारंपारिक रेस्टॉरंटपेक्षा अत्यंत कमी खर्चात क्लाऊड किचनद्वारे नफा कमावता येतो. मेस, कॅन्टीन किंवा अशा इतर सेवांचा स्वतःचा व्यवसाय क्लाऊड किचनच्या मदतीने कमीतकमी गुंतवणुकीत कसा सुरू करावा याबाबत मार्गदर्शन करणारी कार्यशाळा रविवारी (ता. १) आयोजिली आहे. यामध्ये स्वतःचा क्लाऊड किचन ब्रँड कसा सुरू करायचा, घरातूनच मेस अथवा कॅन्टीनचे व्यवस्थापन कसे करायचे, रेस्टॉरंट, कॅफे इत्यादींद्वारे क्लाऊड किचन कसे चालवावे, स्वच्छता आणि सुरक्षा प्रशिक्षण, सरकारी नियम, कायदे, अनुपालन, लायसन, एकापेक्षा अधिक क्लाऊड किचन कसे चालवावेत आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे. ज्यांना हॉटेल अथवा मेस व्यवसाय सुरू करायचा आहे, परंतु पुरेशी गुंतवणूक नाही अशांसाठी क्लाऊड किचन हा उत्तम पर्याय आहे.
संपर्क : ९३५६९७३४२७
शंख साधना कार्यशाळा
भारतीय संस्कृतीमध्ये शंख व त्याच्या ध्वनीला पावित्र्य आहे. ही एक खूप प्राचीन साधना आहे. शंख साधनेद्वारे श्वासोच्छ्वास लांब होतात व दम्यासारखे श्वसनाचे व थायरॉईड, रक्तदाब, मधुमेह संबंधित आजार बरे होतात असा अनेकांचा अनुभव आहे. ज्या व्यक्ती धूम्रपान करतात त्यांनी नियमित शंख साधना केल्यास धूम्रपानाचे व्यसन दूर होते. नियमित योगसाधना करणाऱ्यांनी शंखसाधना केल्यास अंतःकरण अधिक शुद्ध होण्यास मदत होते. मुली आणि महिलाही ही साधना करू शकतात. या पार्श्वभूमीवर रविवारी (ता. १) शंख साधनेविषयी प्रात्यक्षिकासह माहिती देणारी कार्यशाळा आयोजिली आहे. यामध्ये शंख व सनातन धर्म, शंखाचे प्रकार, शंखाची नैसर्गिक निर्मिती, शंख नाद, शरीर व योग यांची माहिती व शंख नादाचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण होणार आहे.
संपर्क : ९१४६०३८०३१
‘बीटूबी’ व ‘डीटूसी’ व्यवसायातून उद्योजक होण्याची संधी
अल्प गुंतवणुकीद्वारे फ्रॅन्चायजी मॉडेल घेऊन सरासरी तीन ते पाच लाख रुपये मासिक उत्पन्न मिळवता येणाऱ्या व्यवसाय प्रारूपाची ओळख करून देणारी विनामूल्य कार्यशाळा रविवारी (ता. १) आयोजिली आहे. कार्यशाळेत प्रिमियम ब्राऊन अंड्यांच्या विक्री व्यवसायाची एजन्सी अथवा फ्रॅन्चायजी कशी मिळेल हे सांगण्यात येईल. युवक, महिला व पुरुष तसेच निवृत्त कर्मचारी यांना कार्यशाळा उपयुक्त आहे. भरपूर मागणी, चांगले मार्जिन, मोनोपॉली प्रॉडक्ट, कमीत कमी गुंतवणूक व घरूनही काम करता येईल असा हा व्यवसाय असणार आहे. एजन्सी व फ्रॅन्चायजी दिल्यानंतर त्यास वन टू वन मार्केटिंग व सेल्स सपोर्ट दिला जाईल.
संपर्क : ७५०७१७२१८१
महारेरा सक्षमता प्रमाणपत्र प्रशिक्षण
प्रशिक्षण व प्रमाणपत्र नसणाऱ्या रिअल इस्टेट एजंटावर धडक कारवाई करत तब्बल २० हजार एजंटची नोंदणी ‘महारेरा’ने नुकतीच रद्द केली आहे. ‘महारेरा’ने आता नवीन एजंट नोंदणी व नोंदणीचे नूतनीकरण हे दोन्ही बंद केले आहे. यापुढे एजंटकडे सक्षमता प्रमाणपत्र असेल तरच नवीन नोंदणी करता येईल अथवा मुदत संपलेल्या नोंदणीचे नूतनीकरण करता येईल. ज्या नोंदणीकृत एजंटकडे सक्षमता प्रमाणपत्र नाही त्यांची रेरा नोंदणी ‘महारेरा’ने रद्द केलेली आहे. नोंदणीकृत रेरा एजंट होण्यासाठी आता २० तासांचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवणे अत्यावश्यक आहे. ‘एसआयआयएलसी’तर्फे होणाऱ्या प्रशिक्षणाची ऑनलाइन व ऑफलाइन बॅच सोमवारपासून (ता. २) सुरू होत आहे.
संपर्क : ७३५०००१६०३
वरील सर्व कार्यशाळा व प्रशिक्षणे सशुल्क असून त्यांचे ठिकाण ः सकाळ मीडिया सेंटर, सकाळ नगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.