कोकण

टेरेस व किचन गार्डन कार्यशाळा

CD

टेरेस व किचन गार्डन कार्यशाळा
पुणे, ता. ११ ः रोजच्या खाण्यात ताजा आणि विषमुक्त भाजीपाला व शोभेची इतर झाडे घरच्या घरी कशी लावू शकतो याविषयी सखोल मार्गदर्शन करणारी कार्यशाळा शनिवारी (ता. १५) व रविवारी (ता. १६) आयोजित केली आहे. घरातल्या घरात लागवड केलेल्या सेंद्रिय भाज्यांचे आरोग्यदायी फायदे, शिवाय वर्षभर बाग फुललेली कशी राखावी, बागेचे आर्थिक गणित कसे बसवावे, बागेचे नियोजन व डिझाइन, लागवडीसाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी, रोपांची निवड, माती व मातीविरहित लागवड करण्याची पद्धत, खत व पाणी व्यवस्थापन, रोग व कीड नियंत्रण याविषयी माहिती दिली जाणार आहे. तसेच सर्व प्रकारचा सेंद्रिय भाजीपाला पिकवणाऱ्या किचन गार्डनला फिल्ड व्हिजिट आयोजित केली आहे.
संपर्क : ८९५६३४४४७२

सोसायटी मॅनेजर प्रमाणपत्र अभ्यासक्रम
सध्या मागणी असणाऱ्या सोसायटी मॅनेजर या करिअर संधीविषयीचे चार दिवसीय प्रमाणपत्र प्रशिक्षण २७ जून रोजी सुरू होणार आहे. यामध्ये सोसायटी मॅनेजरची कर्तव्ये, प्रोफाइल आणि जबाबदाऱ्या, मॅनेजिंग कमिटी अजेंडा व मिनिट्स लेखन, गृहनिर्माण संस्थेतील शेअर्स आणि व्याजाचे हस्तांतरण, देखभाल बिले तयार करणे, टीडीएस भरणे, ऑडिटसाठी चेकलिस्ट, लेखापरीक्षण अहवाल तयार करणे, सोसायटीचे वार्षिक विवरणपत्र सादर करणे, सॉफ्टवेअर प्रशिक्षण, चॅट जीपीटीचा वापर आदी विषयांचा समावेश आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास गृहनिर्माण संस्थांमध्ये सोसायटी व्यवस्थापक म्हणून अर्धवेळ किंवा पूर्णवेळ करिअर संधी उपलब्ध होऊ शकते अथवा गृहनिर्माण संस्थांना विविध सेवा देऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो.
संपर्क : ९३५६९७३४२७

हायड्रोपोनिक्स पद्धतीने घरी पिकवा भाजीपाला
व्यावसायिकदृष्ट्या आधुनिक हायड्रोपोनिक तंत्राने भाजीपाल्याची शेती करून दर्जेदार गुणवत्तेचे उत्पादन कसे मिळवावे, पायलट बेसिसवर हा प्रयोग कसा करावा इ.विषयी मार्गदर्शन करणारी कार्यशाळा २९ जूनला आयोजिली आहे. कार्यशाळेत हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाची ओळख, आवश्यक साधने व फर्टीगेशन, पाण्याची गुणवत्ता व आवश्यक अन्नद्रव्ये, देशी-विदेशी भाज्या, पालेभाज्या, फळभाज्या, औषधी वनस्पती इ. प्रकारचा भाजीपाला कसा पिकवावा, घरच्या घरी हायड्रोपोनिक युनिट अथवा गार्डन कसे उभारावे, हायड्रोपोनिकसाठी रोपे कशी तयार करावी, न्यूट्रियंट सोल्यूशन कसे तयार करावे, सामू, प्रकाश, आर्द्रता, तापमान यांचे महत्त्व, अन्नद्रव्यांची कमतरता व उपाय आदींविषयी सविस्तर मार्गदर्शन होणार आहे. शेतकरी, प्रोफेशनल्स, संशोधक, विद्यार्थी, शेतीविषयक सल्लागार इ. प्रशिक्षणात सहभागी होऊ शकतात.
संपर्क : ९१४६०३८०३१

आयात निर्यात व्यवसाय संधी व व्यवस्थापन
आयात-निर्यात व्यापार, व्यवसाय व व्यवस्थापनासंबंधी मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण २३ व २४ जून रोजी आयोजिले आहे. नफा मिळवून देणाऱ्या या व्यवसायातील विविध संधींविषयी असणाऱ्या अपुऱ्या माहितीमुळे याचा फायदा अजूनही अनेक व्यापारी व नव्याने व्यवसाय सुरु करू इच्छिणारे नवउद्योजक यांना मिळत नाही. या पार्श्वभूमीवर या प्रशिक्षणाचे आयोजन होत आहे. यामध्ये भारत सरकारचे आयात-निर्यात धोरण (एक्झिम ट्रेड), पेमेंट सेटलमेंट व इनकोटर्म्सची आंतरराष्ट्रीय पातळीवर वापरली जाणारी पद्धत, शिपिंग, मालवाहतुकीचे दर, कंटेनर व्यवस्थापन, विदेश व्यापारातील नवीनतम जागतिक ट्रेंड, निर्यात सुरू करण्यापूर्वीची तयारी, आवश्यक कागदपत्रे, वाटाघाटी कशा कराव्या याचे कौशल्य, पॅकेजिंग व लेबलिंगचे मानदंड, सरकारच्या विविध निर्यात योजना, निर्यातदारांसाठी डिजिटल साधने आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८९५६३४४४७२

वरील सर्व कार्यशाळा व प्रशिक्षणे सशुल्क असून त्यांचे ठिकाण ः सकाळ मीडिया सेंटर, सकाळ नगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : पुढील २४ तास धोक्याचे ! राज्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; 'या' ८ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Vidarbha News: राज्यातील शाळांमध्ये पटपडताळणी मोहीम; शाळांमध्ये ११, १५ आणि २२ एप्रिलला तीन दिवस पटपडताळणी प्रक्रिया

Nagpur News: गटारावरील झाकणे ठरताहेत धोकादायक; वर्दळीच्या रामदासपेठेत सुरक्षेला तडा ; मनपाचा बेजबाबदारपणा उघड

Nagpur News: रेशनमधून केरोसीन, हॉटेल्सना पीएनजीची सक्ती!; जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आज हॉटेल व्यावसायिकांची बैठक

Nagpur News: मनपाची संपूर्ण मालमत्ता येणार डिजिटल ट्रॅकवर; एका क्लिकवर मिळणार संपूर्ण कामांचा इतिहास, खर्च आणि देखभालीची माहिती

SCROLL FOR NEXT