

Dino Morea In Mithi River Scam
ESakal
मुंबई : मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी बॉलीवूड अभिनेता डिनो मोरिया यांची शुक्रवारी (ता. २) आठ तास चौकशी करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मोरियांचा जवाबही नोंदवला. त्यानंतर त्यांना सोडण्यात आले. तपासातून पुढे आलेल्या काही महत्त्वाच्या धागेदोऱ्यांच्या आधारे डिनो मोरियांची चौकशी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.