यूट्यूब कंटेंट क्रिएटर होण्याची संधी
‘यूट्यूब कंटेंट क्रिएटर विथ एआय’ ही चार दिवसांची कार्यशाळा २३, २४, ३० व ३१ ऑगस्ट रोजी आयोजिच केली आहे. ज्यांना यूट्यूब व इतर माध्यमांद्वारे कंटेंट क्रिएटर व्हायचे आहे अथवा जे आधीच असे क्रिएटर आहेत, त्यांना स्वतःची पोहोच वाढवायची आहे, अशांना ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. वास्तविक उदाहरणे, प्रात्यक्षिकाद्वारे शिकवण्यावर असलेला भर हे कार्यशाळेचे वैशिष्ट्य आहे. कार्यशाळेत यूट्यूबद्वारे कमाई कशी करता येते याबद्दल संपूर्ण माहिती, स्वत:चे चॅनेल कसे तयार करावे, कथा व पटकथा यांचे लेखन कसे करावे, चांगला व्हिडिओ बनवण्यासाठी कॅमेरा, ध्वनी, प्रकाशयोजना आणि संकलनाचे तंत्र वापरून चांगली सामग्री कशी तयार करता येईल, कंटेंट निर्मितीमध्ये एआयचा रोल व कंटेंट निर्मितीसाठी कोणती एआय साधने वापरावीत याचे उपयुक्त मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
कृषी, अन्न प्रक्रिया व आंतरराष्ट्रीय करिअरवर मार्गदर्शन
पदवीधर तरुणांसाठी करिअरच्या नव्या वाटा खुले करणारी एक खास संधी उपलब्ध झाली आहे. ‘एसआयआयएलसी’तर्फे कृषी, अन्न प्रक्रिया, आंतरराष्ट्रीय करिअर आणि स्पर्धा परीक्षांसंदर्भात विनामूल्य ऑनलाइन चर्चासत्र व मार्गदर्शन सत्रांचे २३ ते ३१ ऑगस्ट दरम्यान सायंकाळी ५ ते ७ या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. कृषी संबंधित उद्योग-स्टार्टअप या विषयावर अक्षय घोरपडे, अन्न प्रक्रिया उद्योग संधी या विषयावर गंधाली दिंडे, आंतरराष्ट्रीय भाषा व करिअर संधी या विषयावर दीपक पागे आणि स्पर्धा परीक्षा व कृषी पदवीधरांसाठी शासकीय नोकरीच्या संधी या विषयावर राहुल खरटमल हे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. कोणत्याही क्षेत्रातील २१ ते २६ वयोगटातील पदवीधर यासाठी पात्र आहेत.
संपर्क : ९८८१०९९४२६, ८४८४८२२१६६.
व्लॉगिंग (लाइफस्टाइल/ट्रॅव्हल/फूड) कार्यशाळा
सोशल मीडियाच्या जगात फॉलोअर्सशी कनेक्ट होण्यासाठी व्हिडिओ सामग्री ऑनलाइन तयार करणे आणि शेअर करणे म्हणजेच व्लॉगिंग करणे लोकप्रिय माध्यम ठरत आहे. लाइफस्टाइल, ट्रॅव्हल, फूड या प्रकारातील व्लॉग पैसे कमाविण्याचे माध्यमही आहेत. ज्यांना या प्रकारामध्ये रस आहे व स्वतःची सर्जनशीलता व्लॉगच्या माध्यमातून पुढे आणायची आहे अशांसाठी याबाबत मार्गदर्शन करणारी कार्यशाळा २४ ऑगस्ट रोजी आयोजित केली आहे. कार्यशाळेत यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्मची मूलभूत माहिती, व्लॉग शूट करण्याचा निर्णय कसा घ्यावा (पूर्वनिर्मिती), व्लॉग कसा शूट करायचा (उपकरणे, कॅमेरा वर्क) व्लॉग एडिटिंग, थम्बनेल, टायटल, साउंड, ग्राफिक्स कसे ॲड करायचे, व्लॉग कसा पॅकेज करायचा, व्लॉगिंग क्षेत्रात भविष्यातील संधी आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे. कार्यशाळेदरम्यान प्रत्यक्ष नमुना व्हिडिओ शूट करून त्यावर चर्चा व शंकानिरसन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
‘महारेरा’ सक्षमता प्रमाणपत्र प्रशिक्षण
प्रशिक्षण व प्रमाणपत्र नसणाऱ्या रिअल इस्टेट एजंटावर कारवाई करत त्यांची एजंट नोंदणी रद्द करण्याचा आदेश ‘महारेरा’ने दिला आहे. ‘महारेरा’ने आता नवीन एजंट नोंदणी व नोंदणीचे नूतनीकरण हे दोन्ही बंद केले आहे. यापुढे एजंटकडे सक्षमता प्रमाणपत्र असेल तरच नवीन नोंदणी करता येईल अथवा मुदत संपलेल्या नोंदणीचे नूतनीकरण करता येईल. ज्या नोंदणीकृत एजंटकडे सक्षमता प्रमाणपत्र नाही त्यांची रेरा नोंदणी ‘महारेरा’ने रद्द केलेली आहे. नोंदणीकृत रेरा एजंट होण्यासाठी आता २० तासांचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवणे अत्यावश्यक आहे. ‘एसआयआयएलसी’तर्फे होणाऱ्या प्रशिक्षणाची ऑनलाइन व ऑफलाइन बॅच २५ ऑगस्टपासून सुरू होत आहे.
संपर्क : ८९५६३४४४७५, ७३५०००१६०२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.