कोकण

शेतजमीन कायदे, हक्क, नोंदणी

CD

शेतजमीन कायदे, हक्क, नोंदणी
पुणे, ता. २८ : शेतजमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार, त्यासाठी कागदपत्रे, ७/१२, फेरफार, गाव नकाशा, गाव नमुना इ. शेतजमीनविषयक कागदपत्रे कशी वाचायची, त्याचा उपयोग आणि वापर कसा करायचा, शेतजमिनीचे प्रकार, शेतजमीन खरेदी, कायदे आणि पळवाटा, महारेरा इ. याविषयी माहिती देणारी एकदिवसीय कार्यशाळा शनिवारी (ता. २९) आयोजिली आहे. यात तलाठी, तहसील कार्यालयातील दस्तऐवज ऑनलाइन कसे मिळवावे, विविध ऑनलाइन उपलब्ध साधने कशी वापरावी इ.बद्दल रिअल इस्टेट प्रशिक्षक रोहित गायकवाड मार्गदर्शन करतील. आपण जमीन मालक, गुंतवणूकदार किंवा प्रॉपर्टी एजंट असाल तर कार्यशाळा उपयुक्त ठरणारी आहे.
संपर्क : ७३५०००१६०२

शिका मोडी लिपी
मोडी ही महाराष्ट्राची प्राचीन आणि समृद्ध लिपी आहे. इतिहासातील अनेक लिखित कागदपत्रांमध्ये बंद असलेला इतिहास वाचण्यासाठी तसेच मराठी संस्कृतीचे जतन करण्यासाठी ही लिपी शिकणे महत्त्वाचे कार्य आहे. जुन्या काळातील अनेक शासकीय दस्तऐवज मोडी लिपीत असतात. या उद्देशाने ५ व ६ एप्रिलला बेसिक व ॲडव्हान्स मोडी कार्यशाळेचे आयोजन केले आहे. यात मोडी लिपीचा इतिहास, मूलभूत ज्ञान, मोडी लिपी अक्षर ओळख तसेच प्रिंटेड व ई-पुस्तकांसोबत लेखन व वाचन सरावाचे प्रशिक्षण घेतले जाणार आहे. मोडी लिपीमध्ये लिहिण्याची व वाचण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी कार्यशाळा उपयुक्त आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

जुन्या इमारतींचा पुनर्विकास
‘एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली’ (यूडीसीपीआर) नियमामुळे महाराष्ट्रात मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात जुन्या इमारतींचा पुनर्विकास (री-डेव्हलपमेंट) सुरु आहे किंवा होणार आहे. हा यूडीसीपीआर नियम काय आहे? त्यामुळे एफएसआय कसा व किती वाढला? त्याचा वापर कसा करायचा? फिसिबिलीटी रिपोर्ट कशासाठी काढतात? पीएमसी म्हणजे काय? आदींबाबत मार्गदर्शन करणारी कार्यशाळा ६ एप्रिलला आयोजिली आहे. यामध्ये इमारतींचा पुनर्विकास करण्याची पद्धत, त्यासाठीचे पेपर्स, विकसक कसा निवडावा, जुन्या सभासदांना होणारे फायदे, करारनामा कसा करावा, महारेरा रजिस्ट्रेशन आदी मुद्यांचे सखोल मार्गदर्शन होणार आहे. सोसायटी स्वयंपुनर्विकास करू इच्छिणारे, नवीन विकसक, ज्यांना रिडेव्हलपमेंट क्षेत्रात रस आहे असे सर्वजण, रिअल इस्टेट एजंटसाठी कार्यशाळा उपयुक्त आहे.
संपर्क : ९३५६९७३४२७

सलून, ब्युटी व्यावसायिकांसाठी कार्यशाळा
सलून आणि ब्युटी व्यावसायिक व कर्मचाऱ्यांसाठी हेअर पॅच व हेअर एक्स्टेंशन ॲप्लिकेशन तंत्र ही एक दिवसीय कार्यशाळा २१ एप्रिल रोजी आयोजिली आहे. कार्यशाळेत केसांचे पॅच आणि एक्स्टेंशन्स लावण्याचे विविध प्रकार तज्ज्ञांकडून समजून घेण्यापासून ते नैसर्गिक लुकचे तंत्र, केसांची सजावट, ॲप्लिकेशन वापरण्याच्या सुरक्षित पद्धती आणि आफ्टरकेअर टिप्स प्रात्यक्षिकासह शिकवल्या जाणार आहेत. कार्यशाळेतील सहभागींना प्रमाणपत्र मिळेल, प्रीमियम हेअर प्रॉडक्टवर विशेष सवलती मिळतील आणि सलूनमध्ये या नवीन शिकलेल्या सेवा प्रदर्शित करण्यासाठीचा रेडी सोशल मीडिया कंटेंट मिळेल. या व्यतिरिक्त, सहभागींना कार्यशाळा पूर्ण झाल्यावरही व्यवसाय वाढवण्यासाठीचे मार्गदर्शन व साहाय्य मिळत राहील.
संपर्क : ८४८४८११५४४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

SCROLL FOR NEXT