कोकण

अन्न प्रक्रिया उद्योजकता विकास प्रशिक्षण

CD

लोगो
अन्न प्रक्रिया उद्योजकता विकास प्रशिक्षण
पुणे, ता. २ : अन्न प्रक्रिया उद्योग हे क्षेत्र उत्पादन, खप, रोजगार आणि निर्यात यादृष्टीने मोठे क्षेत्र आहे. उद्योगातील इतर क्षेत्रांपेक्षा नफ्याचे प्रमाणही अन्नप्रक्रिया क्षेत्रामध्ये जास्त आहे. यासंबंधी मार्गदर्शन करणारे तीनदिवसीय प्रशिक्षण ५, ६ व ७ जुलैला आयोजिले आहे. यात उद्योग व स्टार्टअप स्थापना, ब्रॅण्डिंग, विक्री व प्रसार, निर्यात उद्योगातील संधी, शासकीय योजना, अनुदान, कागदपत्रे, अन्नप्रक्रिया उद्योग व्यवस्थापन, बँक कर्ज व अनुदान इत्यादी बाबींवर मार्गदर्शन तसेच लहान, मध्यम व मोठ्या अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रत्यक्ष भेट, फळे, लोणचे व मसाले यांचे अन्न प्रक्रिया प्रात्यक्षिक होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

सिनेमॅटोग्राफीमध्ये करिअर
चित्रपट वा दूरचित्रवाणी क्षेत्रात करिअर घडवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या नवोदितांसाठी महत्त्वाची असणारी व्यावसायिक छायांकन (सिनेमॅटोग्राफी) कार्यशाळा ५ व ६ जुलैला आयोजिली आहे. आजच्या दृश्यमान (व्हिज्युअल) माध्यमप्रधान जगात चलचित्रकार (सिनेमॅटोग्राफर) या करिअरला सध्या भरपूर मागणी आहे. तसेच सध्या इन्स्टाग्राम, यू-ट्यूब या समाजमाध्यमांवरती जे सामग्री निर्माते (कंटेंट क्रिएटर्स) आहेत, त्यांनाही या क्षेत्रातील कुशल व्यक्तींची गरज आहे. कार्यशाळेमध्ये कॅमेरा हाताळणी, फ्रेमिंग, लाइटिंग आणि कॉम्पोझिशनची मूलतत्त्वे, शॉट्सचे प्रकार आणि त्यांच्या मूव्हमेंट्स यावर सविस्तर मार्गदर्शन मिळेल. तसेच, सहभागींसाठी प्रत्यक्ष चित्रीकरणाचा सरावही होणार आहे. कार्यशाळा प्रात्यक्षिकांवर आधारित व इंडस्ट्री-ओरिएंटेड आहे. त्यामुळे चित्रपट, जाहिरात, वेब सिरीज, माहितीपट इत्यादी क्षेत्रांमध्ये प्रवेशासाठी हे प्रशिक्षण उपयोगी ठरणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

व्यावसायिक हायड्रोपोनिक्स भाजीपाला
व्यावसायिकदृष्ट्या आधुनिक हायड्रोपोनिक तंत्राने भाजीपाल्याची शेती करून दर्जेदार गुणवत्तेचे उत्पादन कसे मिळवावे, पायलट बेसिसवर हा प्रयोग कसा करावा इ.विषयी मार्गदर्शन करणारी कार्यशाळा ५ व ६ जुलैला आयोजिली आहे. कार्यशाळेत हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाची ओळख, साधने व फर्टिगेशन, पाण्याची गुणवत्ता व अन्नद्रव्ये, देशी-विदेशी भाज्या, पालेभाज्या, फळभाज्या, औषधी वनस्पती इ. प्रकारचा भाजीपाला कसा पिकवावा, घरच्या घरी हायड्रोपोनिक युनिट अथवा गार्डन कसे उभारावे, हायड्रोपोनिकसाठी रोपे कशी तयार करावी, न्यूट्रियंट सोल्यूशन कसे तयार करावे, सामू, प्रकाश, आर्द्रता, तापमानाचे महत्त्व, अन्नद्रव्यांची कमतरता व उपाय आदींविषयी सविस्तर मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

आयात-निर्यात व्यवसाय प्रशिक्षण
आजच्या स्पर्धात्मक आणि जागतिकीकरणाच्या युगात व्यापाराला सीमारेषा राहिलेल्या नाहीत. भारतीय उत्पादने जगभरात पोहोचू शकतात, फक्त योग्य मार्गदर्शन, नियोजन आणि धोरणे असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर १२ जुलैपासून सहा दिवसांचे ‘आयात-निर्यात व्यवसाय संधी व व्यवस्थापन’ हे प्रशिक्षण आयोजिले आहे. प्रशिक्षणात एक्झीन धोरण, इन्को टर्म, शिपिंग आणि कंटेनर व्यवस्थापन, दररचना व आंतरराष्ट्रीय मालवाहतूक, तसेच पॅकेजिंग, लेबलिंग, डिजिटल टूल्स आणि सरकारी योजना यावर अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. वाटाघाटी करण्याच्या कौशल्यापासून ते कागदपत्रांची पूर्तता कशी करावी या सर्व बाबींचा प्रशिक्षणात समावेश असणार आहे. स्टार्टअप्स, लघुउद्योजक, व्यापारी आणि नवउद्योजकांसाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरेल.
संपर्क : ८४८४८११५४४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT