28406
पंढरपूर : राज्य सहकारी बँकेने भाविकांच्या सोयीसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीस दिलेली आधुनिक ‘ई-बस’ (सहकार भक्ती-रथ).
पंढरपुरात गर्भवती, दिव्यांग
वृद्धांसाठी वातानुकूलित ई-बस
राज्य बँकेच्या `सहकार भक्ती-रथाचे'' आज लोकार्पण
पुणे, ता. ४ : पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील ‘नो व्हेईकल झोन’मुळे वृद्ध, दिव्यांग आणि गर्भवतींना होणाऱ्या अडचणी लक्षात घेता, राज्य सहकारी बँकेने एक आधुनिक ‘ई-बस’ मंदिर समितीस दिली आहे. ‘सहकार भक्ती-रथ’ या वातानुकूलित बसचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (ता. ५) पंढरपूर येथे होणार आहे.
या बसमध्ये १६ भाविकांची आसनव्यवस्था आहे. बसमधील टेलिव्हिजनवर श्री विठ्ठल-रुक्मिणी पूजेचे थेट दर्शन घेता येणार आहे. २२ लाख रुपये खर्चून तयार केलेली ही बस हैदराबाद येथील तेजस्वी ग्रुप या कंपनीने विकसित केली आहे. मंदिर समितीच्या विनंतीनुसार, राज्य सहकारी बँकेने ही मागणी तातडीने मान्य केली. ‘राज्यातील प्रत्येक सामान्य शेतकऱ्याच्या जीवनात ‘विठ्ठल’ हा श्रद्धेचा आधार आहे. त्यामुळे विठ्ठल मंदिरासाठी सेवा देणे हे आमचे कर्तव्यच आहे,’ अशी भावना राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.