कोकण

तब्बल ४० प्रकारचे चहा व व्यवसाय संधी

CD

तब्बल ४० प्रकारचे
चहा व व्यवसाय संधी
पुणे, ता. १७ : भारतात सर्वाधिक लोकप्रिय पेय चहा आहे. चहाच्या व्यवसायात कधीच तोटा सहन करावा लागत नाही, असाही अनेकांचा अनुभव आहे. प्रसिद्ध झालेल्या ब्रँडच्या फ्रॅंचायजी घेऊन व्यवसाय सुरू करण्याकडे सध्या अनेकांचा कल आहे. अमृततुल्यपासून ते गुळाच्या चहापर्यंत विविध प्रकार बघायला मिळत आहेत. प्रत्येकाच्या चहाची चव वेगवेगळी असते. या पार्श्वभूमीवर कुठल्याही ब्रँडचा आधार न घेता स्वतःच्या हिमतीवर चहा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ४० प्रकारच्या चहाचे प्रशिक्षण २१ व २२ फेब्रुवारीला आयोजिले आहे. यामध्ये चहाचे ४० प्रकार प्रात्यक्षिकासह शिकवण्यात येतील तसेच मोठ्या प्रमाणात ऑर्डर घेऊन ऑनलाइन व्यावसायिक चहा विक्री कशी करायची?, चहा क्षेत्रात स्वतःचा ब्रँड कसा उभा करायचा?, चहाची विक्री कशी वाढवायची? याबाबत मार्गदर्शन होईल. या प्रशिक्षणानंतर थेट व्यवसाय उभे करण्याची व स्वतःच्या कॅफे, हॉटेल, रेस्टॉरंट इत्यादी आस्थापनांची चहा विक्री वाढवण्याची संधी उपलब्ध होईल.

व्हिडिओ एडिटिंग कार्यशाळा
चार दिवसांच्या व्हिडिओ एडिटिंग कार्यशाळेचे आयोजन २८ फेब्रुवारी व १ मार्च तसेच ७ व ८ मार्चला करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यशाळेचा उद्देश व्हिडिओ एडिटिंग कौशल्यांसह सहभागींना सक्षम करणे हा आहे. कार्यशाळेत एडिटिंगचे महत्त्व, वंडरशेअर फिल्मोरा १२ व इनशॉट या दोन लोकप्रिय एडिटिंग साधनांचा वापर करून तसेच विविध एआय टूल वापरून एडिटिंग कसे करावे, स्मार्ट एडिटिंगचे तंत्र, टाइमलाइनमध्ये क्लिप कट करणे, व्हिडिओमध्ये मजकूर व संगीत जोडणे, आवाजाचे एडिटिंग, ग्रीन स्क्रीन व क्रोमा कीइंग इफेक्ट, वेगवेगळे फिल्टर लावणे, मोशन ग्राफिक्स आणि व्हिज्युअल इफेक्ट्स, ऑडिओ ॲडजेस्टमेंट व व्हॉइस ओव्हर, स्मार्टफोन वापरून लक्षवेधी व्हिडिओ तयार करण्यासाठीच्या टीपा या विषयांवर प्रात्यक्षिकांसहित मार्गदर्शन होणार आहे.


पेस्ट कंट्रोल व्यवसाय प्रशिक्षण
पेस्ट कंट्रोल व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी, तसेच विद्यमान टेक्निशियन व फॅसिलिटी मॅनेजमेंट क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा ६, ७ व ८ मार्चला आयोजिली आहे. यामध्ये पेस्ट मॅनेजमेंटची मूलभूत तत्त्वे, विविध कीटकांची ओळख, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, रसायनांचा सुरक्षित वापर, आवश्यक उपकरणांची माहिती तसेच शासन नियमाबाबत सखोल मार्गदर्शन मिळेल. यासह प्रत्यक्ष प्रात्यक्षिके, व्यवसाय नोंदणी व परवाने, निविदा प्रक्रिया, किंमत ठरविणे, एएमसी करार, तसेच डिजिटल मार्केटिंगद्वारे ग्राहक मिळविण्याचे कौशल्य आदींबाबतही माहिती दिली जाणार आहे. नवीन उद्योजक, टेक्निशियन, हॉस्पिटॅलिटी, सिक्युरिटी व लेबर कॉन्ट्रॅक्टर व्यावसायिकांसाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT