कोकण

पोलीस असल्याची बतावणी करून महिलेचे लाखोचे दागिने लंपास

CD

मिरजेत डॉक्टर महिलेला
पावणेदोन लाखांना गंडा
भामट्याने केली पोलिस असल्याची बतावणी
सकाळ वृत्तसेवा
मिरज, ता. १४ ः येथील डॉक्टर महिलेस फोनवरून संपर्क साधत पोलिस असल्याचे सांगून बॅंक खात्यातील तब्बल १ लाख ९८ हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी श्रुती श्रीरंग सांगळे (वय २९, रा. पंढरपूर रोड, मिरज) यांनी अनोळखी भामट्याविरुद्ध तक्रार दिली आहे. यानुसार मिरज शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी श्रुती सांगळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मोबाईलवरून संपर्क साधत मुंबई पोलिसमधून बोलत आहे, असे सांगत तुमच्याविरुद्ध मनी लॉंड्रिंग फ्रॉड केस सुरू आहे, असे सांगितले. तसेच या प्रकरणाचा तपास करीत असल्याचेही सांगितले. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून घेतो. त्याकरिता ऑनलाइन तक्रार देऊन पैसे पाठवावे लागतील. दहा मिनिटांत परत तुमच्या बँक खात्यावर जमा होतील, असेही सांगितले. फिर्यादी सांगळे यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या मोबाईलवर स्काय पी नामक ॲपची लिंक पाठवून गुगल पेला जोडलेल्या बँक खात्यावरून यूपीआय ट्रांजेक्शनद्वारे १ लाख ९८ हजार २० रुपये फसवणूक करून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सांगळे यांनी पोलिसांत धाव घेऊन फिर्याद दिली आहे. मिरज शहर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT