tortoise child 242 found in beach area of madaban vati in rajapur 
कोकण

कासवाची 242 पिल्ले समुद्राच्या कुशीत; राजापूरकरांसाठी अनोखे दृश्‍य

सकाळ वृत्तसेवा

राजापूर (रत्नागिरी) : गेल्या काही वर्षाप्रमाणे यावर्षीही तालुक्‍याच्या पश्‍चिम सागरी किनारपट्टीवरील माडबन आणि वेत्ये किनाऱ्यावर कासवाची १ हजार ३०० अंडी सापडली आहेत. त्यांचे वनविभागाने स्थानिक ग्रामस्थांच्या साथीने संवर्धन केले आहे. त्या अंड्यातून आजपर्यंत बाहेर पडलेल्या तब्बल २४२ पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांपासून माडबन आणि वेत्ये किनाऱ्यावर कासवाची सातत्याने अंडी आढळून येत असून त्याप्रमाणे यावर्षीही अंडी सापडली आहेत. ज्या ठिकाणी कासवाच्या मादीने अंडी घातली होती, त्या भागाला श्‍वापदांसह अन्य कोणापासूनही धोका पोहचू नये, म्हणून जाळीच्या साहाय्याने घरटे करून वनविभागाने स्थानिक ग्रामस्थांच्या साहाय्याने संवर्धित केले आहे. यासाठी वनपाल सदानंद घाटगे, वनरक्षक सागर गोसावी, दीपक म्हादये, विजय म्हादये, शाम गवाणकर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. 

काही पिल्ले मेमध्ये बाहेर

सुमारे ५३ दिवसांच्या कालावधीनंतर या अंड्यातून कासवाची पिल्ले बाहेर येऊन वाळूमधून मार्ग तयार करीत समुद्राकडे झेपावली. अद्यापही काही अंडी संवर्धित करण्यात आली असून त्यातून काही पिल्ले एप्रिल महिन्यामध्ये तर काही पिल्ले मे महिन्यामध्ये बाहेर पडण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

"वनविभागाने घरट्यात संवर्धन केल्यानंतर त्या अंड्यातून तब्बल ५३ दिवसांनी पिल्ले बाहेर पडून समुद्राकडे झेपावली. हा नजारा खरोखरच प्रेक्षणीय हाेता. तसेच या अनोख्या घटनेचा आनंद राजापूरकरांनी लुटला. अजूनही काही घरट्यांमध्ये अंडी आहेत. या अंड्यांचे स्थानिक ग्रामस्थांच्या साह्याने संवर्धन करण्यात आले आहे. ही बाब सुखावणारी आहे."

- सदानंद घाटगे, वनपाल, राजापूर
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 विश्वचषक 2026 प्रसारणावरून गोंधळ; ICCचा मोठा खुलासा, JioStar करार मोडल्याच्या अफवा फेटाळल्या

UPSC Exam: ‘यूपीएससी’चा मोठा निर्णय! 'या' उमेदवारांना मिळणार सोयीनुसार परीक्षा केंद्र

Pune Marathon : मॅरेथॉन दिवशी विद्यापीठात वाहनबंधी; धावपटूंसाठी विशेष शटल बस व पार्किंगची स्वतंत्र सोय!

Santosh Deshmukh Case: मारहाणीचे २३ व्हिडीओ अन् संतोष देशमुखांच्या पत्नी कोर्टाबाहेर धावल्या; वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी

Hadapsar Accident : पुणे–सोलापूर महामार्गावर भरधाव वाहनाची धडक; दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन बळी

SCROLL FOR NEXT