tourism business increased in konkan area said aditi tatkare in ratnagiri 
कोकण

आता पर्यटन व्यवसायाला मिळणार उद्योगाचा दर्जा

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : पर्यटन आणि आदरातिथ्याला उद्योगाचा दर्जा देण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायवृद्धी करणे शक्‍य होणार असून कोकणात बीच शॅकस्‌ योजना मार्च २०२१ पर्यंत प्रायोगिक तत्त्वावर निवडलेल्या ठिकाणी अमलात आणली जाईल, असा विश्‍वास पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्‍त केला.

रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत आदिती तटकरे म्हणाल्या की, मंत्रिमंडळाच्या बैठकीत पर्यटनाला उद्योगांचा दर्जाचा देण्यात आल्यामुळे अनेक व्यावसायिकांना आवश्‍यक त्या सोयी सुविधा उभारण्यासाठी वाव मिळणार आहे. व्यावसायिकांचीही तशी मागणी होती. ती सरकारने मान्य केली आहे. 

कोकणातील निवासी न्याहारी योजनेत अनेक सवलती दिल्या आहेत. यातून पर्यटनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल. कोकण समृध्द करण्यासाठी पर्यटन कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली सकारात्मक निर्णय घेतले आहेत. तसेच कोकणाला पर्यटनातून समृध्द बनविण्यासाठी शासनाने पाच जिल्ह्यातील आठ बिचवर गोव्याप्रमाणे शॅकस्‌ उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रत्येक जिल्ह्यात दोन बिच निवडले आहेत. त्याची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात आहे. मार्च महिन्यात त्याची अंमलबजावणी होईल. जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी तयार केलेल्या ५०० कोटी आराखड्यातून पुढील वर्षभरात निधी देण्याचा आमचा प्रयत्न राहील.

ब्रासला ३,४०० रुपये दर

महागड्या वाळूचे दर कमी करण्यासाठी काही दिवसांपूर्वी महसूलमंत्र्यांबरोबर बैठक झाली. त्यामुळे ब्रासचे दर कमी कसे करता येतील, याचा प्रस्ताव ठेवला आहे. तो पुढील आठवड्यात मान्य होईल. नवीन प्रस्तावामध्ये ब्रासला ३,४०० रुपये दर देण्याचा विचार सुरु असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pachod News : पोळ्याच्या आनंदावर दुष्काळाचे विरजण..! बैलांना आंघोळ घालायलाही नाही पाणी

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी चार युवक पाण्याच्या टाकीवर; सरकारच्या भूमिकेविरोधात संताप

Pune Crime : पतीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून पत्नीने संपविले जीवन

त्यांच्या मिसेस आमच्यासाठी चहा घेऊन आल्या... सचिन तेंडुलकरांच्या पाहुणचाराने भारावलेला निलेश साबळे; म्हणाला- जेव्हा ते आले...

SCROLL FOR NEXT