tourism minister speech kankavli bus stand issue 
कोकण

कणकवली बसस्थानकाबाबत परिवहन मंत्र्यांचे महत्त्वाचे विधान

सकाळ वृत्तसेवा

कणकवली (सिंधुदुर्ग) - मुंबई-गोवा महामार्गालगत सिंधुदुर्गात मध्यवर्ती असलेले एसटीचे कणकवली हे महत्त्वाचे बसस्थानक आहे. हे बसस्थानक विकसीत करणे विचाराधीन आहे. त्यासाठी लवकरच मुंबई येथे स्वतंत्र बैठक घेऊन बसस्थानकाच्या नाविण्यपूर्ण विकासासंदर्भात आराखडा निश्‍चित करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली. 
महाराष्ट्राचे परिवहन मंत्री ऍड. अनिल परब हे एक दिवसाच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून त्यांची हरकुळ खुर्द-मोहूळ येथील निवासस्थानी सोमवारी सिंधुदुर्ग बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. 

बसस्थानकावर प्रवाशांना दर्जेदार सुविधा कशा देता येतील, त्याचबरोबर स्टॉलधारकांनाही चांगली जागा कशी उपलब्ध करता येईल याविषयी लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही मंत्री परब यांनी दिली. सिंधुदुर्ग बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी भेट घेतली. यावेळी मंत्री ऍड. परब यांचा सावंत यांनी सत्कार केला. माजी पं. स. सदस्य महेंद्र डिचवलकर, हरकुळ खुर्द सरपंच विदिशा तेली, उपसरपंच संजय रावले, हेमंत सावंत, विठ्ठल तेली, समीर सावंत, उमेश घाडी आदी उपस्थित होते.

एसटी सिंधुदुर्ग विभागाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करताना सावंत यांनी कणकवली बसस्थानकाच्या विकासाकडे परिवहनमंत्री परब यांचे लक्ष वेधले. कणकवली बसस्थानकाच्या प्रवाशी भारमानाचा विचार करता त्याचे आधुनिकीकरण करणे आवश्‍यक आहे. बसस्थानकाचा विकास केल्यास त्यातून महामंडळाला आर्थिक उत्पन्न वाढीस मदत होणार आहे. सिंधुदुर्गातील बचतगट व कोकणी मेव्यासाठीही जागा उपलब्ध करता येणार आहे असे सतीश सावंत यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील काही महत्वाची बसस्थानके विकसित करण्याचे विचाराधीन असून त्यात कणकवली बसस्थानकाचा समावेश करण्यात येईल. या संदर्भात नियोजन, आराखडा करण्याच्यादृष्टीने लवकरच बैठक घेतली जाणार आहे. तसेच बसस्थानक परिसरात वर्षानुवर्षे व्यवसाय करणाऱ्या स्टॉल धारकांना कशी जागा देता येईल याचाही विचार केला जाणार आहे. एसटी महामंडळाची आर्थिक तुट भरून काढण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना सुरू आहेत. 

सूचना मांडण्याचे आवाहन 
येत्या काळात महामंडळाची आर्थिक घडी बसविण्याच्या दृष्टीने सक्षम उपाययोजना करण्यात येणार असून त्याचे नियोजन सुरू आहे. मुंबईत होणाऱ्या बैठकीमध्ये कणकवली बसस्थानकाच्या विकासाच्या दृष्टीने प्राधान्याने चर्चा करत आराखडा तयार करण्यात येणार आहे. या बैठकीला उपस्थित राहत कणकवली बसस्थानकाच्या विकासासंदर्भात सुचना मांडाव्यात, असे परिवहनमंत्री ऍड. अनिल परब यांनी सतीश सावंत यांना सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT