कोकण

आंबोली धबधब्यावर पुन्हा वनविभागाकडून पर्यटन कर 

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी - आंबोली मुख्य धबधब्यावर जाण्यासाठी लावलेला कर रद्द करण्याचा निर्णय आज वन विभागाने पुन्हा मागे घेतला. याठिकाणी होणारे नुकसान टाळण्यासाठी हे पाऊल उचलले आहेत. मंगळवारपासून (ता.9) हा कर आकारण्यात येईल; मात्र वाद निर्माण झाल्यास प्रसंगी पोलिस बळाचा वापर करणार असल्याचे आंबोली वनक्षेत्रपाल दिगंबर जाधव यांनी सांगितले. 

आंबोली मुख्य धबधब्यावरचा कर कोणी घ्यावा, याबाबत अलीकडे आंबोली, चौकुळ व पारपोली या तिन्ही गावात वाद निर्माण झाला होता. याबाबत दोन दिवसांपूर्वी आंबोलीत चौकुळ, पारपोली व आंबोली तिन्ही गावाची संयुक्त बैठक उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांच्या उपस्थित आंबोलीत झाली होती. या वेळी संयुक्‍त कर गोळा करण्याची मागणी पारपोलीला मान्य नसल्याने तिन्ही गावांमध्ये एकमत झाले नाही. त्यामुळे उद्‌भवणारा वाद लक्षात घेत ही कर आकारणी बंद करण्याची सूचना श्री. चव्हाण यांनी दिली होती. त्यामुळे दोन दिवस आंबोली धबधब्यावरील कर आकारणी बंद होती. 

वर्षा पर्यटनात वन विभागाची होणारी नुकसानी लक्षात घेता या निर्णयात बदल करण्यासाठी व तिन्ही गावांत समझोता करण्यासाठी आज येथील उपवनसंरक्षक कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी आंबोली वनक्षेत्रपाल श्री. जाधव उपस्थित होते. यावेळी झालेली चर्चा यशस्वी न झाल्याने अखेर कर आकारणीचा अधिकार पुन्हा पारपोली वन समितीला देण्याचा निर्णय उपवनसंरक्षक श्री. चव्हाण यांनी घेतला. 

कर न घेतल्याने वन विभागाचे मोठे नुकसान होणार होते. यामुळे कर बंद ठेवण्याचा निर्णयात बदल केला. आजही तिन्ही गावांत एकमत होत नाही, हे लक्षात घेता पालपोली वन समितीला हा अधिकार दिला; मात्र असे असताना पुन्हा वाद निर्माण झाल्यास पोलिस बळाचा वापर करत कर आकारणी सुरू ठेवली जाणार आहे. या निर्णयात धबधब्याच्या कर आकारणीवरून पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्‍यता आहे. 
- दिगंबर जाधव,
वनक्षेत्रपाल 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT