police 
कोकण

पोलिस निरीक्षकाला पर्यटकांकडून मारहाण

रवींद्र पेरवे

लोणेरे - श्रीवर्धन समुद्रकिनारी प्री वेडिंग शूटसाठी पर्यटकांनी पोलिस निरीक्षकालाच मारहाण केल्याची धक्कादायक घटना मंगळवारीआली आहे. या मारहाणीत पोलिस निरीक्षक सुरेश खेडेकर जखमी झाले असून, या प्रकरणी पोलिसांनी 11 जणांना अटक केली आहे.

याबाबतीत श्रीवर्धन पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समुद्रकिनारी काही पर्यटक दारूच्या बाटल्या फोडत जोरदार आरडा ओरडा करत असल्याची तक्रार पोलिसांना दिली. त्यानुसार पेट्रोलिंग करताना पोलिस निरीक्षक एस डी खेडेकर व चालक ठोंबरे यांनी घटनास्थळी जाऊन पर्यटकांना विचारणा केली. त्यांच्याकडे असलेल्या कॅमेरे व ड्रोन कॅमेरा बाबत हटकले असता त्याचा राग लागला. खेडेकर यांना मारहाण करण्यापर्यंत या पर्यटकांची मजल गेली. या मारहाणीत खेडेकर यांच्या डाव्यात हाताला गंभीर दुखापत झाली आहे. 

पोलिसांनी अतुल कन्हैयालाल सुराना, सत्यम अतुल सुराना, शुभम कन्हैयालाल सुराना, वर्षा अतुल सुराना (सर्व राहणार - मार्केटयार्ड, पुणे), प्रचिती रविंद्र सकलेच, संगीता रविंद्र सकलेच (औरंगाबाद), अतुल गोलेचा, विष्णू रामनाथराव गव्हाणे, नागेश मदन पोतदार, मयूर अरुण पोतदार, हर्षल सुनील मसोजी (सर्व राहणार - पुणे) या अकरा जणांविरुद्ध श्रीवर्धन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव पवार हे करीत आहेत. यावेळी बाळा सातनाक, दर्शन विचारे, पिंट्या वेशवीकर, संजीव डेगवेकर, सुरेश करण पाटील, अनंत गुरव, वसंत यादव, राजेश लोहार यांच्यासह दोनशे नागरिक उपस्थित होते. यावेळी आरोपीवर कठोर कारवाई ची मागणी केली. 

श्रीवर्धन मधील पहिलीच घटना - 
श्रीवर्धनमधील समुद्रकिनाऱ्याचे पर्यटकांना नेहमीच आकर्षक आहे. त्यामुळे येथे फोटोशूटसाठी पर्यटकांची खास पसंती आहे. मात्र मंगळवारी पुणे आणि औरंगाबाद येथील दोन कुटुंब प्री वेडिंग शूटसाठी श्रीवर्धन समुद्रकिनारी असताना थेट पोलीस निरीक्षकाला मारहाण करण्याची ही श्रीवर्धन मधील ही पहिलीच घटना आहे. 

पोलिसांवर केलेल्या हल्ल्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करू.
- डी टी सोनके, सहा पोलीस निरीक्षक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT