on tractrue rally narayan rane criticized on the topic of farmers law in sindhudurg 
कोकण

उद्धव ठाकरेंना शेतीतलं काय कळतं ? नारायण राणे यांचा गंभीर आरोप

सकाळ वृत्तसेवा

कणकवली (सिंधुदुर्ग) : उद्धव ठाकरेंना शेतीतलं काय कळतं ? ठाकरे आणि कोकणचं आधीपासूनच वाकडं आहे. मुख्यमंत्री मातोश्रीत बसून सरकार चालवत आहेत. शेतकरी देशाचा प्रमुख घटक आहे. राहुल गांधी यांना शेतीतलं काय कळतं? अशी टीका दोन्ही नेत्यांवर करीत सत्तर वर्षात शेतकऱ्यांसाठी कोणीही काही केलं नाही ते सहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करुन दाखवलं असे भाजपा नेते खासदार नारयण राणे यांनी येथे आपल्या भाषणातून व्यक्त केले.  

केंद्र सरकारच्या कृषी कायदा समर्थनात सिंधुदुर्ग येथे आज (गुरुवार) ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी राणे बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार नितेश राणे, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रदेश सचिव प्रमोद जठार यांच्यासह भाजपचे समर्थक शेतकरी या मोर्चात सहभागी झाले आहेत. 

पुढे बोलताना राणे म्हणाले, गेल्या 70 वर्षात शेतकर्‍यांच्या भल्यासाठी काँग्रेस पक्षाला जे करता आलं  नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करून दाखवलंय. शेतकर्‍यांना आपला कुठेही विकण्याची मुभा त्यांनी कृषी विधेयकातून दिली आहे. पण या विधेयकाला विरोध करणार्‍या राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांना शेतीमधलं काय कळतंय. 70 वर्षे जुन्या कायद्यांमुळे शेतकर्‍यांची कोंडी होत होती. दलालांच्या माध्यमातून आपला माल विकावा लागत होता. हे 70 वर्षाचे जुने कायदे मोदींनी मोडीत काढले. त्यामुळे काँग्रेसची पोटदुखी वाढली आहे. ते कृषी विधेयकाला विरोध करत आहेत.

ते म्हणाले, कोकणात अवकाळी पावसामुळे एवढी नुकसानी झाली. पण राज्यातल्या ठाकरे सरकारनं शेतकर्‍यांना काय दिलं. खरं तर ठाकरेंना कोकणाचं वावडं आहे. त्यामुळे एक रूपयाचीही मदत मिळालेली नाही. सिंधुदुर्गच्या विकासासाठी 142 रूपयांची तरतूद झाली. पण फक्त 21 कोटी रूपये दिले. यातून कसली विकास कामं होणार? असाही सवालही त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ESIC New Rules 2026 : कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! आजारपण आणि प्रसूती लाभांसाठी अर्जाची गरज नाही; पैसे थेट बँक खात्यात जमा होणार

Gadchiroli History: गडचिरोलीच्या घनदाट जंगलात इतिहासाचा खजिना! १६व्या-१७व्या शतकातील ५० वीरगळांचा शोध, शूरवीरांच्या पराक्रमाची शिल्पे उजेडात

IND A vs PAK A: भारत पाकिस्तान सामन्यात टॉसवेळी नेमकं काय घडलं? होत, मॅच रेफ्रींच्या चुकीमुळे वाद, पाकिस्तानी चाहत्यांनी केले आरोप

Water Security 2051 : पुणे महानगर प्रदेशाच्या पाणीपुरवठ्याचे दीर्घकालीन नियोजन; जलसंपदा विभागाचा २०५१ पर्यंतचा जलसुरक्षा आराखडा तयार होणार

Palodwadi Robbery: पालोदवाडीत चार चोरट्यांचा धुमाकूळ; चार घरांवर दरोडा, महिलांच्या गळ्याला चाकू लावून ३.३२ लाखांचा ऐवज लुटला

SCROLL FOR NEXT