The tradition of theater day continues in Devrukh 
कोकण

 देवरुखमध्ये  रंगभूमी दिनाची परंपरा सुरूच 

प्रमोद हर्डीकर

साडवली : पाच नोव्हेंबर रंगभूमी दिन देवरुख खालची आळी येथे नटराज पुजन करुन साजरा होत असतो. गेली ९३ वर्ष ही परंपरा सुरु असून यंदा ९४ वे वर्ष आहे. अजित सावंत यांचे ओटीवर हनुमंतांचे स्थान आहे. या ठिकाणी श्रीफळ ठेवून विधिवत नटराज पुजन करुन ही परंपरा कायम राखली गेली आहे. 

खालची आळी येथील श्री सत्यनारायण प्रासादिक बालमित्र समाज या संस्थेची निर्मितीही याच उद्देशाने त्या काळी झाली. सावंत, रेवणे, खवळे, मिशाळे व अन्य कुंटुबातील मंडळीनी एकत्र येवून भजन, नाटकाच्या माध्यमातून आपली कला जोपासली. डिसेंबर महिन्यातला शेवटचा शनिवार धरुन सत्यनारायण पूजा व तीनअंकी नाटक सादर करण्याची परंपरा गेली ९३ वर्ष जोपासली जात आहे.

अजित सावंत यांचे ओटीवर नटराज पुजन करायचे व डिसेंबरात होणार्‍या नाटकाचा शुभारंभ तेथेच करायचा व कलाकार निवड करुन सरावही तेथेच व्हायचा. सध्या मकरंद रेवणे अध्यक्ष असून पाच तारखेला नटराज पुजन होणार आहे.

गेली ९३ वर्ष ही परंपरा आजची पिढी तेवढ्याच ताकदीने पुढे नेत आहे हे विशेष आहे. येथील रंगमंचाने अनेक कलाकार घडवले आहेत. लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यामुळे तयार झाले आहेत. पारावरचे नाटक हे कोकणातले प्रसिद्घ नाटक मानले जाते. भजन परंपरा व नाटक या माध्यमातून खालची आळी परीसरातील ही समृद्ध परंपरा आजही टिकून आहे. शंभरावे वर्ष मोठ्या प्रमाणावर साजरे करण्याचा मानस व्यक्त करुन त्या दृष्टीने तयारीही सुरु झाली आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भूकच गेली! मुंबईत प्रसिद्ध फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवर झुरळ, डॉक्टरने VIDEO शेअर करत तुकाराम मुंढेंना केलं टॅग

Palghar News : गणेश विसर्जनावेळी पालघरच्या सूर्या नदीत दुर्घटना; १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

SCROLL FOR NEXT