Traditional Fisherman Aggressive In Ratnagiri Kokan Marathi News 
कोकण

हर्णैत पारंपरिक मच्छीमार का झाले आक्रमक ..?

सकाळ वृत्तसेवा

हर्णै (रत्नागिरी) : पुन्हा एकदा एलईडी विरोधात पारंपरिक मच्छीमार बांधवांनी रानच पेटवलं आहे. उद्या २६ जानेवारीनिमित्त रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपरिक मच्छीमार जिल्हाधिकाऱ्यांना अनधिकृत एलईडी मासेमारी बंदीसंदर्भात त्वरित कडक कारवाई करण्याबाबतचे निवेदन देणार आहेत. 

मंत्र्यांनी दिलेल्या बंदीसंदर्भात कडक कारवाईचे आदेश व उद्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले जाणारे निवेदन, याने काय कारवाई होणार, याकडे तीन जिल्ह्यातील पारंपरिक मच्छीमारांचे लक्ष लागले आहे.उपासमारीची वेळ आल्यामुळे पारंपरिक मच्छीमार व एलईडी मासेमारी करणारे मच्छीमार यांमध्ये संघर्ष पेटत चालला आहे.

चार दिवसांपूर्वीच पर्ससीननेट मासेमारी, एलईडी मासेमारी संघटना व पारंपरिक मच्छीमार संघटना यांची राज्य मत्स्यव्यवसाय मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत संयुक्त बैठक पार पडली. तसेच या वेळी एलईडी मासेमारीवर त्वरित बंदची कारवाई करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे यांना दापोली-गुहागर-मंडणगड तालुका मच्छीमार संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.

एलईडी मासेमारी करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश

.राज्यमंत्री भरणे यांच्यासोबत झालेल्या बैठकीदरम्यान एलईडी मासेमारी करणाऱ्या मच्छीमार बांधवांच्या समोरच पारंपरिक मच्छीमार बांधवांची कैफियत ऐकून थेट एलईडी मासेमारी करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे पारंपरिक मच्छीमार बांधवांना थोडा दिलासा मिळाला आहे. तेवढ्यावरच न थांबता काल ता. २४ रोजी सायंकाळी हर्णै बंदरामध्ये बहुसंख्य मच्छीमार बांधवांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये उद्या २६ जानेवारीनिमित्त प्रत्येक जिल्ह्यातील पारंपरिक मच्छीमार जिल्हाधिकाऱ्यांना एलईडी मासेमारी बंदीसंदर्भात निवेदन देतील. 


मच्छीमार सोसायटीचे शिष्टमंडळ..
दरम्यान, उद्या सकाळी प्रत्येक जिल्ह्यातील त्या त्या परिसरातील प्रत्येक मच्छीमार सोसायटीचे एक शिष्टमंडळ हे निवेदन देण्यासाठी हजर राहणार आहे. हे निवेदन रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT