Oil business sakal
कोकण

कणकवली : पारंपरिक तेल व्यवसायाला नवे रूप

बोर्डवेत स्टार्टअप; रोजगारासाठी दोघा तरुणांची धडपड

तुषार सावंत

कणकवली : पुणे-मुंबईमध्ये नोकरीच्या मागे न लागता कणकवली तालुक्यातील बोर्डवे येथील दोन तेली बंधूंनी पारंपरिक व्यवसाय निवडला आहे. लाकडी घाणा तेल व्यवसाय तिसऱ्या पिढीनंतर या दोघांनी स्टार्टअपच्या स्वरूपामध्ये सुरू केला आहे. या व्यवसायात फारसे उत्पन्न नसले तरी बेरोजगारी दूर करण्यासाठी त्यांनी केलेली ही धडपड नव्या पिढीला आदर्श डोळ्यासमोर ठेवणारी आहे.

बोर्डवे येथील कौस्तुभ संतोष तेली आणि त्यांचा चुलत भाऊ कौशिक सुनील तेली यांनी बोर्डवे गावांमध्ये आपल्या वडिलोपार्जित लाकडी घाणा ऊर्जितावस्थेत आणला आहे. याचे कारण ठरला कौस्तुभ तेली. या पदवीधर तरुणाला चार वर्षांपूर्वी नेव्हीमध्ये कॉल आला होता; मात्र तिथे यश न मिळाल्याने मुंबईत काही काळ नोकरी करून तो गावाकडे आला. गावी आल्यानंतर कौशिक हा कृषी डिप्लोमा केलेल्या व बेरोजगार असलेल्या भावाने एकत्रित विचार केला. गावातीलच काहींनी वडिलोपार्जित व्यवसाय तुम्ही सुरू केला तर बरं होईल, असा सल्ला दिला. तो सल्ला मिळाल्यानंतर तेली बंधूनी गुगल सर्च करून लाकडी घाण्यासाठी मिळणारे सगळे साहित्य आणि यंत्रणा शोधली. अखेर त्याला यश आले आणि वडिलोपार्जित असलेला तेलाचा लाकडी घाणा व्यवसाय त्यांनी मार्च २१ रोजी सुरु केला. या व्यवसायाला आठ महिन्यांचा कालावधी झाला असला तरी यात समाधानकारक असे यश मिळालेले नाही; पण तेली बंधूंची धडपड मात्र त्यांना यशाकडे नेणारी आहे. कोकणात भुईमुगाचे उत्पादन फारसे घेतले जात नाही. त्या तुलनेत गुजरात राज्यामध्ये भुईमुगाचे मोठे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे तेली बंधूंना गुजरातवरून शेंगदाना आयात करावा लागतो. गोव्यातूनही काही प्रमाणात शेंगदाणा येतो.

दरम्यान, पारंपरिक व्यवसायातून स्टार्टअप सुरू केल्यानंतर ते समाधानी आहेत; पण या व्यवसायामध्ये हवी तशी भरभराट त्यांना अजूनही मिळालेले नाही. कारण बाजारपेठेमध्ये खाद्य तेलाचे दर फारच कमी आहेत. गावठी घाण्यावरच्या शेंगदाणा तेलाचे दर अधिक आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरील ग्राहक फारसे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे मार्केटमध्ये उच्च दर्जाचे तेल खरेदी करणारा ग्राहक शोधावा लागतो असे मत कौस्तुभ तेली यांनी व्यक्त केले.

अन् विक्री झाली सुरू

तेली बंधूंनी लाकडी घाण्यावर महिन्याकाठी साधारण अडीचशे लिटर तरी उत्पादन घेण्याचा विचार सुरू केला आणि त्याला यशही आले. यासाठी त्यांनी एक ते ५ लिटर असे पॅकेजिंगचेही ज्ञान अवगत केले आहे. प्लास्टिकच्या एक लिटरच्या बॉटलमध्ये शुद्ध शेंगदाणा तेल ते विक्री करतात. बाजारभावापेक्षा कमी दराने जवळचे ग्राहक किंवा मार्केटमधील काही व्यावसायिक त्यांचा माल उचलत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranji Trophy 2026: मुंबईने ६४ चेंडूंत जिंकली मॅच!Tanush Kotian च्या ८ विकेट्स, तर Musheer Khan ची ऐतिहासिक कामगिरी

Meenakshi Shinde Resign: ठाण्यात मोठी घडामोड! प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरण; मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा

'ए' गरम पाणी पीत जा!’ भर मैदानात वैभव सूर्यवंशीला मिळाला खास सल्ला, VIDEO व्हायरल

Spain Train Crash: 'Minister Of Death' म्हणत उडाला संतापाचा भडका! ६८ बळींनंतर स्पेनमध्ये राजीनाम्यासाठी आंदोलन

Smile Day 2026: चेहऱ्यावर हसू, पण मनात दुःख? आनंदी दिसणं आणि खरोखर आनंदी असणं यात नेमका फरक काय?

SCROLL FOR NEXT