Traffic closed on Mumbai-Pune route 
कोकण

मंडणगड, दापोलीत वाहतूक करायचीय हा मार्ग आहे मोकळा...

सकाळ वृत्तसेवा

मंडणगड (रत्नागिरी) : तालुक्यात कोरोना रुग्ण सापडल्याने मंडणगड व दापोलीकडे मुंबई-पुणे व अन्य ठिकाणीहून मंडणगड मार्गाने होणारी प्रवासी, अत्यावश्यक, जीवनावश्यक अशा सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली असल्याची माहीती दापोली प्रांताधिकारी शरद पवार यांनी दिली आहे. त्यामुळे म्हाप्रळ व लाटवण मार्गाने मुंबई व पुण्याकडुन येणारे तालुक्यातील दोन्ही मार्ग सर्व प्रकारच्या वाहतूकीसाठी बंद झाले आहेत.

संपूर्ण जिल्हयातील नागरीक हे कोरोनामुक्त असताना मुंबई सारख्या शहरातुन आलेल्या चाकरमानीच कोरोना पाॅझीटीव्ह आढळून आल्याने जिल्हा प्रशासन मुंबई पुणे येथुन येणाऱ्या नागरीकांसाठी सतर्क झाले आहेत. त्यामुळे यापुढे मुंबई व पुणे येथून रत्नागिरी जिल्हयात यायचे झाल्यास किंवा मंडणगड व दापोलीकडे येणाऱ्या नागरिकांना आता केवळ मुंबई गोवा महामार्गाने कशेडी मार्गेच यावे लागणार आहे.

मंडणगड तालुक्यात कोरोनाचा रूग्ण आढळल्याने मंगळवार पासून तालुक्याचे व जिल्हयाचे प्रवेशव्दार असणारे म्हाप्रळ व लाटवण ही दोनही प्रवेशव्दारे जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवेसह दुचाकी, चारचाकी अशा सर्वच वाहनांसाठी बंद करण्यात आली आहेत. नागरीकांची वाढलेली संख्या लक्षात घेऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक आता कशेडी मार्गाकडे वळविण्यात येणार आहे.

कशेडी घाटात तपासणी नाका बसवण्यात येणार आहे.येथुन येणार्या नागरीकांचे प्रथम स्वॅब तपासून क्कांरन्टाईन करण्यात येणार आहे. अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कारवाई करण्यात येणारे आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांमधील व्यक्तीनाही या प्रक्रीयेतून जावे लागणार आहे. मंडणगड, दापोली तालुक्यात येणारे नागरिकांचे विविध मार्गाने दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने या उपायोजना केल्या असून त्याची अंमलबजावणी मंगळवार ता.५ मेपासून सुरु होणार आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : 'सिंचन अनुशेष निर्मूलनाचे जनक' प्रा. बी. टी. देशमुख यांचे देहावसान; तब्बल तीस वर्षे विधीमंडळाचे केले प्रतिनिधीत्व

Porsche Car Accident Case : अगरवालचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांची न्यायालयात धाव

कोण होती 'मोगली गर्ल'? २०१७ ला वयाच्या ८ व्या वर्षी सापडली जंगलात, १८ वर्षी निधन

बुलेट छब्या गेला! बैलगाडा शर्यतीतील हिंदकेसरीची एक्झिट; अंत्यसंस्काराला हजारोंचा जनसागर, थार अन् लाखोंची बक्षिसे जिंकली...

Pune News : डॉ. प्रदीप कुरुलकर विरुद्ध दोषारोप निश्चित; जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुनावणीला सुरुवात

SCROLL FOR NEXT