Phondaghat Kankavali esakal
कोकण

Phondaghat : फोंडाघाटातून अवजड वाहतूक बंद; रस्त्यावरील मोरीला पडले भगदाड, 'या' वाहनांसाठी घाटमार्ग कधी सुरू होणार?

फोंडाघाट बाजारपेठेपासून घाटमार्गात १३ किलोमीटरवरील मोरीवरील रस्त्याला भगदाड पडले आहे.

सकाळ डिजिटल टीम

प्रमुख घाटमार्ग असलेल्या करुळ घाटाची दुरुस्ती सुरू असल्‍याने तो सहा महिने बंद आहे. त्‍यामुळे बहुतांश वाहनचालकांकडून फोंडाघाटचा वापर केला जात होता.

कणकवली : मुसळधार पावसामुळे फोंडाघाट (Phondaghat Kankavali) रस्त्यावरील मोरीला भगदाड पडले आहे. त्‍यामुळे घाटातून अवजड वाहतूक बंद केली आहे. रस्ता दुरुस्तीचे काम दोन दिवसांत पूर्ण होण्याची शक्‍यता सार्वजनिक बांधकाम खात्‍याने (Construction Department) व्यक्‍त केली आहे. तोपर्यंत केवळ हलक्‍या वाहनांसाठी घाटमार्ग सुरू ठेवला आहे.

फोंडाघाट बाजारपेठेपासून घाटमार्गात १३ किलोमीटरवरील मोरीवरील रस्त्याला भगदाड पडले आहे. ही बाब लक्षात आल्‍यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपकार्यकारी अभियंता के. के. प्रभू यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. येथील मोरीच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे निर्देश अभियंत्‍यांना तसेच ठेकेदाराला दिले. दरम्‍यान, रस्त्याला मोठे भगदाड पडल्‍याचे समजताच कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनीही फोंडाघाटमध्ये जाऊन पाहणी केली.

येथील मोरी दुरुस्तीच्या कामासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्‍यता आहे. या मार्गावरून अवजड वाहने नेण्यात आली तर येथील रस्ता आणखी खचण्याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे फोंडाघाटातील अवजड वाहनांची वाहतूक भुईबावडामार्गे वळविली आहे. खचलेल्‍या रस्ता परिसरात एकेरी वाहतूक सुरू केली आहे. पुढील दोन दिवसांत येथील रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकामकडून देण्यात आली.

प्रमुख घाटमार्ग असलेल्या करुळ घाटाची दुरुस्ती सुरू असल्‍याने तो सहा महिने बंद आहे. त्‍यामुळे बहुतांश वाहनचालकांकडून फोंडाघाटचा वापर केला जात होता. आता अवजड वाहतूक भुईबावडा घाटमार्गे वळविण्यात आल्‍याने वाहनचालकांना जादा किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rani Mukherjee Mother Death: अभिनेत्री राणी मुखर्जीला मातृशोक! कृष्णा मुखर्जींचं निधन, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Asian Games 2026 Medal Table: भारतीय महिलांच्या 'Gold' ने पदकतालिकेत उलथापालथ, १२ व्या स्थानावर असलेलो आपण थेट पोहोचलो...

Supreme Court: एससी-एसटी कायद्यातील तरतुदींना आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली; नेमकं प्रकरण काय?

Numerology: लहान मुलांचा हट्टीपणा अन् जन्म तारीख; 'या' ३ मूलांकांची मुले असतात प्रचंड हट्टी! पाहा काय सांगते अंकशास्त्र...

Vishakha Raut: विशाखा राऊतांना दिलासा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; प्रिया सरवणकरांच्या नियुक्तीला ब्रेक

SCROLL FOR NEXT