pali
pali 
कोकण

पालीत वाहतूक कोंडीचा प्रश्न जटिल

अमित गवळे

पाली (रायगड) : उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे अष्टविनायकांपैकी बल्लाळेश्वराचे स्थान असलेल्या पालीत भाविकांची मोठी गर्दी आहे. रोज मोठ्या संख्येत भाविक व त्यांची वाहने पालीत दाखल होत आहेत. त्यामुळे येथे वाहतुक कोंडीचा प्रश्न जटिल झाला आहे. परिणामी भाविक व पादचारी यांची मोठी गैरसोय होत आहे.

पालीच्या बाहेरुन बाह्यवळण मार्गाला मंजुरी असुनही हा मार्ग लालफितीत अडकला आहे. या संदर्भात सकाळ मागील तीन चार वर्षांपासून बातम्यांच्या पाठपुरावा करत आहे. खाजगी, अवजड व लक्झरी वाहनांची ये-जा, नियमांचे उल्लंघन करणारे चालक, अरूंद रस्ते व रस्त्याच्या दुतर्फा लावलेली वाहने व बांधकामे यामूळे पालीत सतत वाहतूक कोंडी असते. सुट्टयांमूळे मोठ्या प्रमाणात पर्यटक व भाविक पालीत दाखल होत आहेत. या वाहनांमुळे पालीतील वाहतुकीवर प्रचंड ताण येवुन वारंवार अनेक ठिकाणी वाहतुक कोंडी होत आहे. येथील बल्लाळेश्वर मंदिर, मारुती व महाकाली मंदिर, ग.बा. वडेर हायस्कूल, जुने एस.टी.स्टँड, गांधी चौक, बाजारपेठ  या ठीकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. ही वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी काही नाक्यावर वाहतुक पोलीस तैनात असुन देखिल अरुंद रस्ते, अवजड वाहतूक, एकेरी वाहतुकीवररुन दुहेरी वाहतुक आणि वाहनचालकांनी वाहतुकिचे नियम न पाळल्याने व रस्त्याच्या दुतर्फा अवैधरित्या पार्क केलेली वाहने यांमुळे पोलीसांना या वाहतुक कोंडीवर नियंत्रण मिळविणे कठीण होते.

बल्लाळेश्वर मंदिर परिसरात बल्लाळेश्वर देवस्थानचे सुरक्षा रक्षक देखिल वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी तैनात आहेत. संध्याकाळ नंतर मात्र बर्याच वेळा वाहतुक पोलीस तैनात नसतात. अाणि यावेळी सुद्धा बर्याचवेळा वाहतुक कोंडी होते. हा प्रश्न सोडविण्यासाठी बाह्यवळण (बायपास) काढण्याची मागणी येथील नागरिकांकडुन वारंवार होत आहे. बलाप गावावरुन थेट बल्लाळेश्वर मंदिराजवळ मार्ग काढण्याचा पर्याय आहे. त्यासाठी शासनाची मंजुरी देखिल मिळाली आहे. परंतू हा पर्यायी मार्ग लालफितीत अडकला आहे.

वाहनचालकांनी नियमांचे पालन केले पाहिजे. अवैध पार्किंग करणाऱ्यांवर ठोस कारवाई केली पाहिजे. मोक्याच्या ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करण्यात यावे. पर्यायी बाह्यवळण रस्त्याचे काम लवकर मार्गी लावावे.
- संजय (आप्पा) घोसाळकर, पाली,  माजी ग्रामपंचायत सदस्य 

वाहतूक कोंडीत वाढ
मुंबई गोवा महामार्गावर वाहतुक कोंडी होत आहे. त्यामुळे पुण्या-मुंबई वरुन कोकणाकडे जाणारे प्रवासी पालीतून विळेमार्गे माणगाववरुन किंवा वाकणवरूण पुढे जातात. तर कोकणाकडून येणारी वाहने माणगाववरुन विळे मार्गे पालीतून खोपोलीमार्गे पुणे-मुंबईकडे जातात. परिणामी पालीत अधिक वाहुक कोंडी होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. अजित पवार, उदयनराजे भोसले यांनी केलं मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Sakal Podcast : मावळ लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? ते सुनीता विल्यम्सची पुन्हा अवकाश भरारी

SCROLL FOR NEXT