Transgender Department in Ratnagiri Jail sakal
कोकण

रत्नागिरी कारागृहात ट्रान्सजेंडर विभाग

कारागृह प्रशासनाने प्रस्ताव पाठविला; राज्यातील पहिलाच विभाग

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : तृतीयपंथी कैद्यांसाठी लवकरच येथील विशेष कारागृहात ट्रान्सजेंडर विभाग सुरू होणार आहे. तसा प्रस्ताव कारागृह प्रशासनाने पाठविला असून, महाराष्ट्रातील हा पहिला विभाग ठरणार आहे. उच्च न्यायालय आणि राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या सूचनेवरून याची पुढील कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात आजपर्यंत एकाही कारागृहात स्वतंत्र असा ट्रान्सजेंडर विभाग नाही. महाराष्ट्राच्या बाहेर दोन ट्रान्सजेंडर कारागृहे आहेत. सर्व कारागृहांमध्ये स्वतंत्र ट्रान्सजेंडर वॉर्ड तयार करण्यात यावे, अशा सूचना सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने २०१४ मध्ये केल्या होत्या; परंतु राज्यात अद्याप एकही स्वतंत्र ट्रान्सजेंडर विभाग नाही.

परिस्थितीनुसार कोणाकडूनही गुन्हे घडू शकतात. त्यामुळे न्यायालयीन सुनावणीनंतर शिक्षा भोगण्यासाठी कारागृहात काही दिवस आरोपीला ठेवले जाते. म्हणून महिला किंवा पुरुष तृतीयपंथी यांच्यासाठी कारागृहात स्वतंत्र ट्रान्सजेंडर वॉर्ड सुरू केला जाणार आहे. ओडिसामध्ये ट्रान्सजेंडर स्वतंत्र कारागृह कार्यान्वित आहे. या ट्रान्सजेंडर कारागृहात वावरताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ही संकल्पना पुढे आली आहे. अद्यापपर्यंत कोणत्याही कारागृहात हे ट्रान्सजेंडर स्वतंत्र वॉर्ड सुरू नाहीत. रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहाने हा प्रस्ताव पाठविण्यासाठी तयारी सुरू केली आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल, असा विश्वास कारागृह प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला. रत्नागिरीला मंजुरी मिळाल्यास राज्यातील हे पहिले स्वतंत्र ट्रान्सजेंडर विभाग असणारे कारागृह ठरणार आहे.

न्यायालयाच्या आदेशावरून कार्यवाही

रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहाने मात्र यात पुढाकार घेतला आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये तृतीयपंथी गुन्हेगार आहेत. मात्र, त्यांना शिक्षा झाल्यास कारागृहात ठेवण्यासाठी स्वतंत्र वॉर्ड नाही. त्यांना इतर महिला किंवा पुरुष वॉर्डमध्ये ठेवता येत नाही. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशावरून येथील कारागृह प्रशासनाने स्वतंत्र वॉर्ड उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

Kaygaon News : शेतकरी पुत्राची गरुड भरारी, धनगरपट्टीच्या शुभम खैरेची नगरपरिषद अधिकारीपदी निवड

Pune Ganeshotsav : दोन वर्षांपासून सहभागी मंडळांनाच यंदा मिरवणुकीत प्रवेश; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती

SCROLL FOR NEXT