tribute balasaheb thackeray vengurla konkan sindhudurg 
कोकण

बाळासाहेबांमुळे मराठी माणसाला न्याय ः परब

दीपेश परब

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - मराठी माणसाला न्याय देण्याचे काम हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी केले. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही चांगले नेतृत्व महाराष्ट्राला मिळाले आहे. सागरतीर्थ ग्रामपंचायतीवर शिवसेनेने वर्चस्व प्रस्थापित करून आगामी निवडणुकांची नांदी केली आहे. या नंतरच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकेल. तीच खरी बाळासाहेबांना आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन तालुकाप्रमुख यशवंत ऊर्फ बाळू परब यांनी केले. 

वेंगुर्ले तालुका शिवसेना व आधार फाउंडेशन सिंधुदुर्गच्या संयुक्त विद्यमाने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोरोना काळात योगदान दिलेल्या व्यक्तींचा सन्मान येथील साई डिलक्‍स सभागृहात करण्यात आला.

व्यासपीठावर शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब, जळगावच्या शिवसेना उपजिल्हा संघटक मनीषा परब, उपजिल्हाप्रमुख आबा कोंडस्कर, सुनील डुबळे, आधार फाउंडेशनचे नंदन वेंगुर्लेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन वालावलकर, शहरप्रमुख अजित राऊळ, उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, नगरसेवक सुमन निकम, संदेश निकम, तुषार सापळे, युवा सेना तालुका अधिकारी पंकज शिरसाट, आरवली उपतालुका प्रमुख सुधाकर राणे, शहर समन्वयक विवेक आरोलकर, सुरेश भोसले, अभिनय मांजरेकर आदी उपस्थित होते. 

यावेळी सर्वप्रथम तालुका कार्यालयात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित आयोजित केलेल्या रांगोळी प्रदर्शनाचे उद्‌घाटन दाभोली येथील ज्येष्ठ शिवसैनिक मोहन तेंडोलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी कट्टा मालवण येथील प्रसिद्ध रांगोळीकार समीर चांदरकर यांचा सत्कार झाला.

कोरोना काळात काम केलेले पोस्टाचे कर्मचारी राजेंद्र निनावे, दशरथ हळदणकर, राजन पालकर, प्रकाश चव्हाण, रघुनाथ पेडणेकर, संतोष परब, महावितरणचे कर्मचारी बाळा गावडे, वसंत वराडकर, किशोर मोर्ये, हर्षद मुळीक, विशाल चेंदवणकर, प्रवीण कांबळी, नवीन परब, प्रथमेश भगत, शेखर पंडित, साहिल गावडे, संदेश शिरोडकर, आदित्य खानोलकर, पवन गायकवाड, गणेश राऊळ, वेंगुर्ले गॅस सर्व्हिसचे कर्मचारी निलेश तुळसकर, अनिषा देऊलकर, मीनाक्षी गोडकर, गीतांजली नाईक, करिश्‍मा रेडकर, सुरेश निरवडेकर, शैलेश पेडणेकर, सुभाष सरमळकर, राजन सावंत, ओंकार मुळगावकर,

भारत संचार निगमचे कर्मचारी प्रवीण राजापूरकर, राजन केरकर, पत्रकार दीपेश परब, भटवाडी शाखाप्रमुख दिलीप राणे तसेच सागरतीर्थच्या निवडणुकीत विजयी झालेले शिवसेनेचे उमेदवार एकनाथ कुडव, ज्ञानदेव चोपडेकर, मेरी फर्नांडिस, स्मिता फर्नांडिस, बिनविरोध निवडून आलेल्या समृद्धी कुडव यांचाही सत्कार झाला. सचिन वालावलकर यांनी सूत्रसंचालन केले. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET ते TET... 2024 मध्येच कायदा आला, तरी पेपरफुटी थांबली नाही; सरकारकडे उत्तर आहे का? नवीन कायदा कशासाठी? Fact Explained...

Gokul Politics : गोकुळ दूध संघात नवा ट्विस्ट! 'त्या' सहानुभूतीवरून शौमिका महाडिक यांच्यावर 410 सभासदांचा घणाघात; कोल्हापूरच्या राजकारणात नक्की काय घडतंय?

Latest Marathi News Live Update : शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी लोकसभेत विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी

Rojgar sangam Portal: कंपन्या थेट प्रोफाइल पाहून करणार शॉर्टलिस्ट; १० वी पास ते पदवीधरांना एका क्लिकवर मिळणार सरकारी नोकरी

Abhijit Dipake Arrest Claim : आज रात्री आम्हाला अटक होणार... अभिजीत दिपके यांचा मोठा दावा; तिसरी चूक करु नका, सरकारला थेट इशारा

SCROLL FOR NEXT