Trip bus accident on Raigad road mangaon kokan sakal
कोकण

रायगड रस्त्यावर सहलीच्या बसला अपघात  

बस २० फूट खोल दरीत कोसळली; मात्र सुदैवाने ही बस झाडाला अडकल्याने मोठी दुर्घटना टळली.

सकाळ वृत्तसेवा

माणगाव : पुण्यातील खासगी मिनी बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने माणगाव तालुक्यातील घरोशी वाडी घाटरस्त्यावर शुक्रवारी (ता. ११) रात्री अपघात झाला. ही बस २० फूट खोल दरीत कोसळली; मात्र सुदैवाने ही बस झाडाला अडकल्याने मोठी दुर्घटना टळली. या अपघातात सात जण जखमी झाले असून चार जणांना पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी बसचालकाविरोधात माणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील निगडी येथील एका शाळेतील काही शिक्षक, पालक आणि विद्यार्थी खासगी मिनी बस क्र. एमएच १४ सीडब्ल्यू ७२५७ ने किल्ले रायगड येथे शुक्रवारी सहलीला आले होते. रायगडवर सहल झाल्यानंतर पुण्याकडे परतीच्या प्रवासादरम्यान माणगाव-रायगड रस्त्यावर दहा किमी अंतरावर घरोशी वाडी घाटरस्त्याच्या तीव्र उतारावर चालकाचे नियंत्रण सुटून मिनीबस २० फूट दरीत कोसळली. संध्याकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान झालेल्या या अपघातात दुर्गा शिंदे (वय ३६), अंजू जगताप (वय ४८), गार्गी कुलदीप भदाने (वय १३), कविता कुलदीप भदाने (वय ३४), हर्षदा टिळेकर (वय ३५), प्रेमाली गुंड (वय ३६) आणि सोनिया सुनील समुद्रे (वय ३०) या जखमी झाल्या आहेत.

या अपघातामध्ये दोघांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. जास्त मार लागलेल्या चौघांना पुणे येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या प्रकरणी चालक शब्बीर मन्नुदीन लासने (वय ३६, रा. ता. उदगीर, जिल्हा लातूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे, असे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: ट्रम्प इफेक्टमुळे सहा दिवसांनी सोनं स्वस्त! चांदीचा भावही घसरला; पाहा आजचा ताजा भाव

Bihar Laborer Killed in Sangli : मित्रानेच काढला काटा! जुन्या धामणीत नदीकाठी बिहारी मजुराचा धारदार शस्त्राने चिरला गळा; सांगलीत 72 तासांत पाचवा खून

Pune News: हिंजवडीत दूषित पाणी पिण्याची नामुष्की; सोसायट्यांमधील स्थिती, शुद्धीकरणानंतरही दुर्गंधी, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर!

Who is Sameer Rizvi: वडिलांना ब्रेन हॅमरेज... CSK ची ८ कोटीची बोली अन् आता DC साठी गाजवतोय मैदान, जाणून घ्या समीरची कहाणी

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

SCROLL FOR NEXT