कोकण

सिंधुदुर्गात होतेय 'हळद क्रांती'; शेती दृष्टीने शुभसंकेत

एकनाथ पवार : सकाळ वृत्तसेवा

वैभववाडी : नियोजनबद्ध लागवड, उत्तम व्यवस्थापन, उत्पादित मालावर प्रकिया आणि त्याची स्थानिक आणि मुंबईसारख्या (mumbai market) बाजारपेठेत विक्री, अशा सर्व पातळ्यांवर काम करीत जिल्ह्यातील (sindhudurg district) अनेक स्वयंसहाय्यता बचत गट आणि महिलांनी हळद लागवडीतून ८ लाखांचा नफा मिळविला आहे. पांरपरिक आणि चाकोरीबद्ध शेतीच्या पलीकडे जात सिंधुदुर्गातील पीक पद्धतीत होत असलेला हा सकारात्मक बदल म्हणजेच हळद क्रांतीच्या (turmeric cultivation) दिशेने वाटचाल मानली जात आहे. शिवाय ही उमेद अभियानाची फलश्रुती आहे.

जिल्ह्यात आंबा, काजू, कोकम, सुपारी आणि भात पिकांच्या पलीकडे जाऊन शेतकरी शेतीतील नवे पर्याय शोधताना दिसत आहेत. शेतीसोबतच आंतरपिक लागवडीतून नफा मिळविण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे; परंतु त्यात आता जिल्ह्यात हळद क्रांतीच्या दिशेने पावले पडताना दिसत असून हे शेतीच्या दृष्टीने शुभसंकेत आहेत. जिल्ह्यातील वातावरणात उत्तम दर्जाची हळद पिकू शकते आणि त्यातून चांगला नफाही मिळु शकतो हे अभियानांतर्गत स्थापन झालेल्या महिला स्वयंसहाय्यता बचत गटांनी सिद्ध केले आहे.

एरव्ही शासनाचे बरेचसे उपक्रम आणि अभियाने ही कागदावरच रंगविली जातात, अशी काहीजण टीका करतात; परंतु हे अभियान त्याला अपवाद ठरले आहे. यांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सांघिक काम केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील १५० बचत गटांनी सन २०२०-२१ मध्ये ७ लाख ७९ हजार ६६० रुपये किंमतीचे १३ हजार १८६ किलो बियाण्यांची लागवड केली. बचत गट आणि महिलांना भगीरथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून लागवड, व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले. उत्पादित हळदीवर प्रकिया, उत्कृष्ट पॅकिंग आणि स्थानिक व मुंबईसारख्या बाजारपेठेत विक्री करण्यात आली.

११ हजार ४०१ किलो हळद पावडर विक्रीतून तब्बल २३ लाख १३० रूपये मिळविले. खर्च वजा ८ लाखाचा निव्वळ नफा हळदीतून झाला. त्यामुळे हळद लागवडीतून नफा मिळविता येतो हे सिद्ध झाले. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंबा, काजू बागा आहेत. त्यामध्ये आंतरपिक म्हणनु हळद लागवड केल्यास त्याचा चांगला परिणाम शेतकऱ्यांना होणार आहे.

"एखाद्या जिल्ह्यातील पीक बदलाचा अर्थकारणावर मोठा परिणाम होतो. आंबा, काजुने जिल्ह्याच्या अर्थकारणाला गती देण्याचे काम केले. त्याचप्रमाणे हळदरूपी पिवळ सोन असून त्यामध्ये कोकणातील अर्थकारण बदलण्याची सुप्त शक्ती आहे."

- डॉ. प्रसाद देवधर, भगीरथ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग

"जिल्ह्यातील वातावरणाचा विचार करून हळद पिकाची निवड केली. महिला बचतगट आणि वैयक्तिक पातळीवर देखील हळद लागवड केली होती. लागवड, व्यवस्थापन आणि विक्रीचे मार्गदर्शन करण्यात आले. त्याचा एकदंरीत चांगला परिणाम दिसून आला."

- वैभव पवार, व्यवस्थापक, जिल्हा व्यवस्थापन कक्ष

"एक हेक्टर क्षेत्रावर गादिवाफ्यांत जुन २०२०ला हळद लागवड केली. त्यासाठी २ टन बियाणे लागले. पाणी, खताचे योग्य नियोजन केले. २७०० किलो हळकुंड मिळाली. एक लाख ४० हजाराचा खर्च, २ लाख ७० हजाराचे उत्पन्न मिळाले."

- सुनीता अनाजी सावंत, अध्यक्ष, दिशा ग्रामसंघ गांधीनगर, हरकुळ

इतर पिकांसोबत हळदीचा बोलबाला

जिल्ह्याच्या अर्थकारणात आंबा, काजुसह कोकम, सुपारीचे स्थान देखील अधोरेखीत आहे. शिवाय बांबुची अर्थव्यवस्था उभी राहत आहे. यांत्रिकीकरण, ‘श्री’ पद्धतीने भात लागवड यामुळे भातपीक उत्पादनात वाढ झाल्यामुळे कधीकाळी न परवडणारे भातपीक आता फायदेशीर ठरत आहे. या पिकांसोबतच आता जिल्ह्यात हळदीचा बोलबाला सुरू झाला आहे.

‘सिंधु आत्मनिर्भर’ही पोषक

सिंधु आत्मनिर्भर अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात हळद लागवड क्षेत्रात वाढ करण्यात येत आहे. हे अभियान देखील जिल्ह्याच्या हळद क्रांतीच्या दृष्टीने पोषक मानले जात आहे.

लागवडीवर एक नजर

- प्रतिगुंठा लागते २५ किलो बियाणे
- बचत गटांना प्रतिकिलो ५८ रुपयांनी बियाणे
- हळदीला प्रतिकिलो सरासरी २०० रूपये दर
- स्थानिक आणि मुंबईत देखील विक्री
- १५० हुन अधिक बचत गटांची लागवड
- यंदा ८ लाख ५७ हजार ९८४ रुपयांचा नफा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गडचिरोलीत मोठी नक्षलविरोधी कारवाई! भामरागड तालुक्यात तीन नक्षलवाद्यांचा खात्मा

Maharashtra Lok Sabha Election 2024 LIVE : छत्रपती संभाजी नगरमधल्या मतदान केंद्रावर EVM मशीन बंद

Health Survey : जेवणात जास्त मीठ खाणाऱ्यांना होऊ शकतो कॅन्सर?; व्हिएन्ना युनिव्हर्सिटीच्या संशोधकांचा अहवाल

China-India Trade: हिंदी-चीनी भाई भाई! बहिष्कारानंतरही चीनमधून आयात वाढली, 100 अब्ज डॉलर्सची उलाढाल

Latest Marathi News Live Update : मुंबई- गोवा महामार्गावर एक तासापासून वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT