कोकण

तीन गुंठ्यांतून हळदीचे ४५० किलो उत्पन्न

अमित पंडित

साखरपा - हळद लागवडीचे प्रयोग कोकणात बऱ्याच ठिकाणी होत असतात. पण अवघ्या ३ गुंठे जागेत लागवड करून ४५० किलो उत्पन्न मिळवण्यात कोंडगाव येथील एकता महिला बचत गटास यश आले आहे. संपूर्ण सेंद्रिय खताचा वापर करून हे उत्पन्न मिळवले आहे.

कोंडगाव येथील एकता महिला स्वयंसहाय्यता बचत गटाने हळद लागवडीचा प्रयोग केला. गटात १० महिला आहेत. गटाच्या सदस्या धनश्री जोशी, अध्यक्षा सिद्धी डाफळे यांच्या पुढाकारातून गटाने हळद लागवडीचा निर्णय घेतला. पहिलाच प्रयोग असल्याने ३ गुंठे जागेत लागवड करण्याचा निर्णय गटाने घेतला. हळदीचे कंद लावून लागवड करण्याचे पारंपरिक तंत्र असताना गटाने आधुनिक पद्धतीने लागवड करण्याचे ठरवले. हळदीच्या खांडाचे बारीक तुकडे करून त्यापासून तयार करण्यात आलेल्या रोपांची लागवड केली. 

कंदाचा दर ७० रुपये प्रती किलो असताना नव्या पद्धतीने तयार केलेली रोपे अवघ्या दीड रुपये प्रतीरोप एवढ्या अत्यल्प किमतीला खरेदी करून लागवड केली. कोणतेही रासायनिक खत न वापरण्याचा निर्णय महिलांनी घेतला आणि केवळ शेणखत वापरले.

हळदीची काढणी दोन दिवसांपूर्वी करण्यात आली. तब्बल ४५० किलो हळद काढली. सध्या ही हळद कापण्याचे आणि सुकवण्याचे काम सुरू आहे. सेंद्रिय खतावर तयार करण्यात आलेल्या हळदीला स्थानिक बाजारपेठेतून मागणी आहेच. मुंबई आणि पुण्यातही मागणी आहे. 

‘‘सेंद्रिय खताचा वापर केलेल्या हळदीला औषधी गुण जास्त असतात. त्यामुळे ग्राहक जास्त आहेत आणि किंमतही जास्त मिळते. पहिल्याच प्रयत्नात मिळालेला नफा पुढील वर्षी नक्की प्रेरणा देईल.’’ 
- धनश्री जोशी,
बचत गट सदस्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT