Turtle found walking in ST bus 
कोकण

एसटी बसमध्ये फिरताना आढळले चक्क कासव

सकाळ वृत्तसेवा

लांजा - वेंगुर्ले- रत्नागिरी एसटी बसमध्ये चालक व वाहकाला कासव फिरताना आढल्याने कासवाला एस टी कर्मचाऱ्यानी त्याला लांजा येथील वनविभागाच्या ताब्यात दिले. मात्र कासव एस टी बस मध्ये आढळल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

वेंगुर्ले-रत्नागिरी एसटी बसच्या कर्मचाऱ्यांना बसमध्ये सापडलेले कासव हे गोड्या पाण्यातील असल्याचे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र एस टी बसमध्ये कासव आढळल्याने तस्करीबाबतचा मोठा संशय व्यक्त केला जात आहे. वेंगुर्ले ते रत्नागिरी अशी एसटी फेरी सुरू असताना बसवाहक यांना बसमध्ये काळ्या पाठीचे एक कासव फिरताना दिसून आले. त्यांनी याबाबतची माहिती चालकाला दिली. कासवाला ताब्यात घेऊन एसटी बस रविवारी सकाळी 11 वाजता लांजा बस स्थानकात आली असता लांजाचे वाहतूक नियंत्रक यांना त्याची माहिती दिली. कासव सापडल्याची माहिती एसटी कर्मचारी यांनी लांजा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिल्यावर वनविभागाचे कर्मचारी लांजा बस स्थानकात दाखल झाले. कासवाला ताब्यात घेऊन त्यांनी कासवाला वन अधिवासात सोडून दिले. 

सोनेरी रंगाचे कासव सापडले होते 
दोन वर्षांपूर्वी रेल्वे ट्रॅक मार्गावर सुल्काटा जातीचे सोनेरी रंगाचे कासव सापडले होते. रविवारी एस टी बसमध्ये काळ्या रंगाचे व गोड्या पाण्यातील कासव सापडल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जाते आहे. कासवाची तस्करी केली जात नाही ना, असा सवाल प्राणीमित्रांना पडला आहे. 


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ganesh Idol Collapse : कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली, वीजवाहिनीचा धक्का लागला अन् गोखले कॉलेज चौकातील घटना

Gyanesh Kumar : १४ आक्षेप, १६.१० लाख अपील... निवडणूक आयोगात पडद्यामागे काय घडलं? ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका

Asian Games 2026: कबड्डीत भारताला दोन सुवर्ण जिंकण्याची संधी; दोन्ही संघ फायनलमध्ये! लढती कुठे, किती वाजता पाहता येणार?

‘कौन बनेगा करोडपती’मध्ये उज्ज्वल निकम यांनी जिंकली प्रेक्षकांची मन, जिंकलेली रक्कम दान करण्याचा निर्णय

Maharashtra Ganesh Visarjan Live: मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीत स्व-रूपवर्धिणी मल्लखांब पथकाचे थरारक सादरीकरण

SCROLL FOR NEXT