Twelve Hundred Kilos of Hapus at the door of the British kokan Marathi News 
कोकण

अबब... सव्वाबाराशे किलो हापूस ब्रिटनवासियांच्या दारी 

राजेश कळंबटे : सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातल्यामुळे हापूसच्या निर्यातीवर प्रश्‍न निर्माण झाला होता. परिस्थितीवर मात करत रत्नागिरी हापूस पुण्यातील विक्रेत्याकडून 1250 किलो हापूस हैदराबादमार्गे खासगी विमानाने इंग्लंडला पोचला आहे. कार्गोसाठी तिप्पट भाडे आकारणीचा भुर्दंड बसला आहे. गतवर्षीच्या तुलनेत एक महिना उशिराने हापूस पोचला. 

मार्चमध्ये कोरोनाने भारतात पाय पसरायला सुरवात केली. त्याचा परिणाम कोकणच्या हापूस विक्रीवर झाला. यंदा उत्पादन दीड महिना लांबले; पण मार्चच्या अखेरीस बागायतदारांची गैरसोय झाली. राज्यात 25 मार्चला लॉकडाऊन झाल्याने वाशी, पुणे बाजार समिती ठप्प होती. राज्यांतर्गत विक्रीवरच संक्रांत आली होती. त्यातून मार्ग काढण्यात कृषी, पणन मंडळाला यश आले. महिना झाला तरीही विमान वाहतूक बंदच असल्यामुळे निर्यात सुरु करण्यात अडथळे होते. समुद्रमार्गे आखाती देशांमध्ये सुमारे साडेचार लाख बॉक्‍स एप्रिलमध्ये गेले. युरोप, अमेरिकेतील निर्यात सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु होते. त्यासाठी पणनकडून निर्यात केंद्र स्थापन केले होते. 

इंग्लंडमध्ये हापूसला मोठ्या प्रमाणात मागणी असते. बाष्पजल किंवा उष्णजल प्रक्रिया करुन आंबा पाठविण्यात येतो. आंबा इंग्लंडला जाण्यासाठी तेथील मराठी विक्रेते तेजस भोसले यांच्याशी संपर्क सुरु होता. त्यासाठी खासगी कार्गो पाठविण्याचा निर्णय झाला. 279 ते 310 रुपये किलो दराने कार्गोचे भाडे आकारले आहे. गतवर्षी 90 रुपये प्रतिकिलो दराने भाडे आकारले होते. पूर्वी प्रवासी विमानातून आंबा जात होता. विमान वाहतूक बंद असल्याने तिप्पट दर आकारला जात आहे. त्यावरही मात करत रत्नागिरी हापूस बुधवारी (ता. 29) इंग्लंडला पोचला.

चांगल्या दराची अपेक्षा

तिकडेही कोरोनामुळे परिस्थिती गंभीर आहे. मार्केट सुरु असल्यामुळे आंबा विक्री करणे शक्‍य असल्याचे तेथील व्यावसायिकांचे मत आहे. हापूसचा दर गतवर्षी इंग्लंडमध्ये 12 ते 13 युरो म्हणजे भारतीय चलनानुसार साडेनऊशे ते अकराशे रुपयांपर्यंत होता. यंदा तो सुमारे साडेतेराशे ते चौदाशे रुपयांपर्यंत मिळेल, अशी अपेक्षा तेथील व्यावसायिकांकडून वर्तविली जात आहे. दरवर्षी मार्च अखेरीस इंग्लंडला आंबा जातो; परंतु कोरोनामुळे तो एक महिना लांबला आहे. निर्यातीसाठी बेंगळूर, हैदराबाद, मुंबई विमानतळांचा उपयोग केला जात आहे. 

कोरोनामुळे परिस्थिती गंभीर आहे. त्यातूनही मार्ग काढत रत्नागिरीचा हापूस इंग्लंडमध्ये दाखल झालेला आहे. हापूस एक महिना उशिराने आला असून दर चांगला मिळेल अशी आशा आहे. 
- तेजस भोसले, विक्रेते, इंग्लंड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

Latest Marathi News Live Update : मालेगाव मध्ये तापमान 38.2 अंशावर पोहचले

SCROLL FOR NEXT