Twenty four hour watch on the dams in ratnagiri 
कोकण

'या' जिल्ह्यात धरणांवर राहणार चोवीस तास पहारा

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - तिवरे (ता. चिपळूण) धरणाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून पावसाळ्यापूर्वी पावले उचलण्यात आली आहेत. कोरोनाची टाळेबंदी सुरू असतानाही प्राथमिक दुरुस्त्या करून घेण्यात आल्या असून सर्व धरणे सुस्थितीत आहेत. जिल्ह्यातील सर्व धरणांवर पहारेकरी, चौकीदार नेमण्यात आले आहेत. कुवारबाव येथील सिंचन भवनात पूर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.


जिल्ह्यात पूर्ण झालेले एकूण 1 मध्यम व 30 लघु पाटबंधारे, 5 को. प. बंधारे असे एकूण 36 बंधारे आहेत. मागील वर्षी 2 जुलैनंतर धरण सुरक्षितता संघटना नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व धरणांची तपासणी करून अहवाल सादर करण्यात आला होता. त्या अहवालानुसार काही धरणांची किरकोळ दुरुस्ती आवश्यक होती. त्यामध्ये काही धरणांच्या माती भरावातून, विमोचनातून किंवा सांडव्यातून पाणी गळती होत असल्याचे निदर्शनास आले. या सर्व धरणांच्या दुरुस्ती कामांचे प्रस्ताव कोकण विकास महामंडळाच्या ठाणे कार्यालयाकडे पाठवण्यात आले होते. त्यातील 16 दुरुस्ती कामांना मंजुरी मिळाली होती. त्याची निविदा प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली होती. प्रामुख्याने निवे, मोरवणे या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे सुरू आहेत. कोरोनातील टाळेबंदीमुळे कामे वेळेत सुरू करता आलेली नव्हती; परंतु अत्यावश्यक दुरुस्ती करून धरणांना धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे, असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. या कक्षाच्या माध्यमातून धरणातील पाणीसाठा, सद्यःस्थिती, पावसाचे प्रमाण याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे व पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे माहिती दिली जाते. सर्व धरणांची पावसाळ्यापूर्वी पाहणी झालेली आहे. या पाहणीतून सर्व धरणे सुरक्षित असल्याचे निदर्शनास आलेले आहे.

सहा नद्यांवर फलकांची माहिती

पावसाळ्यात पर्यटकांनी जाऊ नये यासाठी आवश्यक ते सूचना फलक लावण्यात आलेले आहेत. जलसंपदा विभागामार्फत जिल्ह्यातील काजळी नदी, जगबुडी नदी, मुचकुंदी नदी, अर्जुना नदी, शास्त्री नदी, वाशिष्ठी या नद्यांचे रेड लाईन व ब्ल्यू लाईन सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्याचे रेखाचित्र जलसंपदा विभागाच्या वेबसाइटवर सर्वांसाठी अपलोड करण्यात आलेले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT